Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?

नवी दिल्ली - भारत सरकारने चीनविरोधात मोठं पाऊल उचलत 59 चायनिज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने त्या सर्व अॅप्सची यादीही जाहीर केली आहे. दरम्यान, टिकटॉक सारख्या लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर सरकारचेही अकाउंट होते असा दावा केला जात आहे. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचेही टिकटॉकवर अकाउंट होते असे स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहेत. यामध्ये भारत सरकारचे टिकटॉक @mygovindia अशा नावाने होते. याबाबत लोकांमध्येही संभ्रम आहे. खरंच हे अकाउंट सरकारचे होते का? याबाबत सरकारकडून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. मात्र याला व्हेरिफायइड टिक असल्यानं ते सरकारचेच असण्याची शक्यता होती. 

आता भारत सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर मात्र @mygovindia अकाउंट टिकटॉकवर दिसत नाही. ते डिलिट केल्याचं किंवा असा युजर नसल्याचंच नोटिफिकेशन येतं. भारत सरकारच्या या अकाउंटवर तब्बल 1.1 मिलियन फॅन्स होते तर एकूण 7.9 मिलियन लाइक्स मिळाल्या होत्या. सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्म ऑफ इंडिया असंही याच्या बायोमध्ये नमूद करण्यात आलं होतं. Image

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाचेदेखील टिकटॉक अकाउंट होते अशी चर्चा आहे. @cmomaharashtra असं युजरनेम असलेलं अकाउंट टिकटॉकवर होतं. याचे फॅन्स 1.5 मिलियन्स तर लाइक्स 10.5 मिलियन्स इतक्या होत्या. आता टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर माय गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे टिकटॉक अकाउंट उपलब्ध नसल्याचं दिसत आहे. 
Image may contain: text

टिकटॉकची मालकी ही एका चीनी कंपनीची आहे. बाइटडान्स असं नाव असलेल्या या कंपनीने कमी वेळेच्या व्हिडिओसाठी टिकटॉकचा प्लॅटफॉर्म तयार केला होता. गेल्या काही महिन्यांमध्ये टिकटॉक आणि युट्यूब युजर्समध्येही सोशल मीडिया वॉर रंगलं होतं. कंटेटवरून एकमेकांची खिल्ली उडवणं आणि आरोप करण्याचे प्रकार सुरू होते. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3dKslEc

Comments

clue frame