नवी दिल्लीः सॅमसंगचा जबरदस्त फीचर असलेला स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट १० सीरिजला बजेटमधील किंमतीत लाँच करण्यात आले होते. याची बेस व्हेरियंट किंमत ३८ हजार ९९९ रुपये आणि टॉप व्हेरियंटची किंमत ४० हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. आता कॅशबॅक ऑफर नंतर या फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः काय आहे ऑफर ? अॅमेझॉन इंडियावर गॅलेक्सी नोट १० लाईट चा ६ जीबी रॅम मॉडलची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम मॉडलची किंमत ४२ हजार ९९९ रुपये आहे. ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळाल्यानंतर या फोनची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आणि ३६ हजार ९९९ रुपये झाली आहे. परंतु, ही कॅशबॅक ऑफर केवळ सिटीबँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड धारकांना मिळणार आहे. ही ऑफर १३ जून २०२० पासून ६ ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये नोट १० प्रमाणे नोट १० लाईट मध्ये सुद्धा S Pen दिला आहे. त्यामुळे हे अन्य फोन पेक्षा वेगळा दिसतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशनचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये Exynos 9810 प्रोसेसर आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर आणि सिंगल फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेऱ्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 4,500mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3e9lANz
Comments
Post a Comment