Realme च्या X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या SuperZoom स्मार्टफोनचे  जबरदस्त फीचर्स आणि किंमत

रिअलमी  या स्मार्टफोन कंपनीने मागच्याच  आठवड्यात भारतात नवीन X3 सीरिज लाँच केली. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीने लाँच केले असून दोन्ही स्मार्टफोन्समध्ये जबरदस्त  फीचर्स दिले आहेत. कंपनीने Realme X3 आणि Realme X3 SuperZoom हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध केले असून  , त्या  दोन्ही स्मार्टफोनच्या विक्रीसाठी  भारतात आज पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या सेलमध्ये रियलमी नार्जो १० ला आकर्षिक ऑफर आणि बेस्ट डीलसोबत खरेदी करता येतील . आज  फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात होईल.

 Realme X3  चे आकर्षक  बजेट
Realme X3 SuperZoom हा स्मार्टफोन कंपनीने फोनचे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. यातील एका मॉडेलमध्ये तब्बल 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. या व्हेरिअंटची किंमत 32,999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आहे. Realme X3 हा स्मार्टफोनही कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये आणला आहे. या फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ग्लेशियर ब्लू, आर्क्टिक व्हाइट अशा आकर्षक कलर्समध्ये असणार आहेत.  

स्मार्टफोनचा  एचडी  डिस्प्ले
X3 SuperZoom या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या डिव्हाइसमध्ये पॉवरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट असून तब्बल 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. फोनमधील  फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. 

 Realme X3 चे खास फीचर्स 
 फोनच्या कॅमेऱ्यात असलेला 60x झूम. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सल पेरिस्कोप लेन्स, 8 मेगापिक्सल (105 डिग्री) अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी  आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सल आणि  8  मेगापिक्सलचा असा ड्युअल फ्रंट कॅमेरा मिळेल. नाइटस्केप 4.0 आणि Starry Mode या फोनमध्ये आहे, याच्या मदतीने नाईट फोटोशूट करता येईल. 

SuperZoom चे सेटअप  फीचर्स 
दुसरीकडे Realme X3 फोनमधील जवळपास सर्व फीचर्स SuperZoom मॉडेल्सलप्रमाणेच आहेत. पण कॅमेरा सेटअपमध्ये फरक आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सल +8 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सोबतच  रिअर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप असला तरीही यामध्ये  पेरीस्कोप सेन्सर  असणार नाही. 

तर मग ५ कॅमेऱ्याच्या रियलमी फोन खरेदी करण्यासाठी पटकन या सेलचा लाभ घ्या. 



from News Story Feeds https://ift.tt/31uZCAU

Comments

clue frame