Mitron अॅपची जबरदस्त क्रेझ, १ कोटींहून अधिक डाऊनलोड

नवी दिल्लीः TikTok ला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या Mitron अॅपला गुगल प्ले स्टोरवर १ कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. दोन महिन्याआधी लाँच झालेल्या या अॅपला चीन विरोधी वातावरणाचा फायदा मिळाला आहे. प्ले स्टोरवर या अॅपला ४.५ ची रेटिंग मिळाली आहे. वाचाः अॅपवरून झाला आहे वाद मित्रों अॅपवरून गेल्या काही दिवसात वाद झाला होता. या अॅपच्या सोर्स कोडआधी एका पाकिस्तानी डेव्हलपरने खरेदी केले होते. पंरतु, नंतर या अॅपचे सह संस्थापक शिवांक अग्रवाल आणि अनीष खंडेलवाल यांनी या अॅपच्या सोर्स कोडवरून स्पष्टीकरण दिले होते. सीईओ शिवांक अग्रवाल यांनी एक प्रेस नोट जारी करून एक कोटी डाऊनलोड झाल्याची माहिती देऊन अॅप लोकल ओरिजनल सुद्धा हायलाईट केले. युजर्संकडून बग्स असल्याची तक्रार लाँचच्या काही वेळानंतर काही अॅप युजर्संनी या अॅपसंबंधी तक्रार केली आहे. युजर्संचे म्हणणे आहे की, या शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉ़र्मवर अनेक बग आहेत. गुगल प्ले स्टोरवर टिकटॉक अॅपचे क्लोन पेक्षा जास्त काही नाही. निगेटिव्ह रिव्ह्यू नंतर या अॅपने लाँचिंगनंतर ५० लाख युजर्संची संख्या गाठली होती. वाचाः सायबर एक्सपर्टकडून दिलीय वॉर्निंग या अॅपला गुगलच्या स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसीचे उल्लंघन केल्याचे सांगून प्ले स्टोरवरून हटवले होते. काही वेळानंतर पुन्हा त्याची एन्ट्री झाली आहे. काही सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सने या अॅपच्या धोक्यासंबंधी माहिती दिली आहे. या अॅपमुळे कुणीही सहज फोन हॅक करून मेसेज पाठवू शकतो. तसेच युजरच्या जागी दुसऱ्या लोकांना फॉलो आणि पोस्टवर कमेंट करु शकतो, असा धोका याआधी सायबर एक्स्पर्टने सांगितला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38e2J1L

Comments

clue frame