गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान

नवी दिल्ली - गूगलने अँड्रॉइड युजर्ससाठी असलेली 30 अॅप्स प्ले स्टोअऱवरून हटवली आहेत. त्या अॅप्समध्ये धोकादायक मेलवेअर सापडल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आता नव्या युजर्सना प्ले स्टोअरवर संबंधित अॅप्स डाऊनलोड करता येत नाहीत. मात्र आधी डाऊनलोड केलेल्या 2 कोटी युजर्सना ती अॅप्स अपडेट करता येणार नाहीत. युजर्सना अॅप्स डिलिट करण्याचा सल्ला दिला जात आहे. समोर आलेल्या अॅप लिस्टमध्ये सर्वाधिक युजर्सनी थर्ड पार्टी सेल्फी अॅप्स डाऊनलोड केले आहेत. यात मेलवेअर आढळले आहेत.

चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी

WhiteOps च्या सिक्युरिटी रिसर्चर्सने या अॅप्सचा शोध लावला असून यामध्ये अनेक अॅड्स दिसतात. तसंच लिंकवर क्लिक न करता युजर्सच्या फोनमध्ये ओपन होतात. एवढंच नाही तर एकदा डाऊनलोड केल्यानंतर अॅप डिलिट होत नाही. गुगलने डिलिट केलेल्या अॅप्समधील तुम्ही काही अॅप्स इन्स्टॉल केले असतील तर डिलिट करा. 

मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी

अॅप्सची यादी 
Yoriko Camera, Solu Camera, Lite Beauty Camera, Beauty Collage Lite, Beauty and Filters camera, Photo Collage and beauty camera, Gaty Beauty Camera,  Pand Selife Beauty Camera, Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera, Benbu Seilfe Beauty Camera, Pinut Selife Beauty and Photo Editor, Mood Photo Editor and Selife Beauty Camera, Rose Photo Editor and Selfie Beauty Camera, Selife Beauty Camera and Photo Editor, Fog Selife Beauty Camera, First Selife Beauty Camera and Photo Editor, Vanu Selife Beauty Camera, Sun Pro Beauty Camera, Funny Sweet Beauty Camera, Little Bee Beauty Camera, Beauty Camera and Photo Editor Pro, Grass Beauty Camera, Ele Beauty Camera, Flower Beauty Camera, Best Selfie Beauty Camera, Orange Camera, Sunny Beauty Camera, Pro Selfie Beauty Camera, Selfie Beauty Camera Pro, Elegant Beauty Cam-2019,  

MI Band 5 लाँच; 11 स्पोर्ट्स मोड असलेला बँड भारतात कधी?

जवळपास 30 अॅप्स एकूण 2 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आली आहेत. WhiteOps कडून सांगण्यात आले की युजर्सला अॅड दाखवण्यासाठीच अॅप्सचे डिझाईन करण्यात आले होते. अॅप पब्लिश केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्यांनी प्रत्येक 11 व्या दिवशी नवीन अॅप पब्लिश केलं. याशिवाय या अॅप्सच्या apk मध्ये पॅकर्सचा वापर करून मेलवेअर्स लपवण्यात आले होते. 
 



from News Story Feeds https://ift.tt/310J9V5

Comments

clue frame