विना रिचार्ज मिळवा ५० रुपये, BSNLची ऑफर

नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेडकडून आपल्या ग्राहकांना ५० रुपयांपर्यंत दिले जात आहे. ही ऑफर टॉकटाईम लोनसोबत येते. कंपनीची ही ऑफर अशा वेळी आहे. ज्यावेळी काही युजर्संना आपल्या फोनमध्ये कॅश न नसल्याने रिचार्ज करु शकत नाही. तसेच लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. बाकी टेलिकॉम ऑपरेटर्सकडून सुद्धा ग्राहकांना दिलासा दिला आहे. वाचाः बीएसएनएलने अशा युजर्संसाठी ऑफर आणली आहे. काही कारणांमुळे आपला नंबर रिचार्ज करु शकत नाही. OnlyTech रिपोर्टच्या माहितीनुसार, बीएसएनएलकडून विना रिचार्ज युजर्संना ५० रुपयांपर्यंत लोन या ऑफर अंतर्गत मिळत आहे. युजर्संना या प्रमाणे वेगळ्या टॉकटाईम लोन ऑफर १० रुपये, २० रुपये, ३० रुपये आणि ५० रुपये दिला जात आहे. या प्लान्सचा फायदा घेण्यासाठी युजर्संना USSD कोड डायल करावे लागेल. असा मिळणार फायदा लोन ऑफरचा फायदा घेण्यासाठी युजर्संना सर्वात आधी आपल्या फोनवरून *511*7# डायल करावे लागेल. हा कोड डायल केल्यानंतर त्यांना एक प्रॉम्प्ट दिसेल. या ठिकाणी युजर्स निवडू शकेल की, कोणत्या किंमतीचे लोन हवे आहे. रक्कम सिलेक्ट केल्यानंतर युजर्संना सेंड बनटनवर क्लिक करावे लागेल. युजर्स 'Check my points' ऑप्शन सुद्धा सिलेक्ट करू शकता. या टॉकटाईम लोन प्लानची बाकी माहिती शेअर करण्यात आली नाही. वाचाः नंतर द्यावे लागेल पेमेंट कंपनीकडून २०१६ मध्ये असाच एक प्लान आणला होता. त्यावेळी युजर्सना १० रुपयांचे लोन एसएमएसच्या मदतीने मिळवता येत होते. त्यानंतर पुढील रिचार्जवेळी ११ रुपये युजर्संकडून घेतले जात होते. नवीन लोन ऑफर मध्ये सुद्धा युजर्संकडून चार्ज घेतला जाईल. युजर्संना लोन घेण्यासाठी ऑप्शन मिळत आहे. परंतु, हे स्पष्ट नाही की, लोन घेतल्यानंतर किती परत करायचे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d9dTFD

Comments

clue frame