BS-6 लागू झाल्यावरही 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील 'या' कार 

नवी दिल्ली - भारतात बीएस6 नॉर्म लागू झाल्यानंतर आता ऑटोमोबाइल कंपन्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. बाईक ते कारपर्यंतच्या किंमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत लोक महागड्या गाड्या खरेदी करणं कठीण आहे. त्यातही कार घेण्यासाठी कितीपत खर्च करू शकतील अशीही शंका आहे. मात्र यातही तीन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीतील काही कार उपलब्ध आहेत. सध्या ३ लाख रुपयांत कोणतीच कार ऑनरोड खरेदी करता येत नसली तरीही विक्री वाढवण्यासाठी कंपन्यांकडून काही ऑफर दिल्या जात आहेत. यामध्ये डिस्काउंट दिला जात आहे. 

दॅटसन रेडी गो ही कार किंमतीच्या बाबतीत परवडणारी आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 2 लाख 83 हजार रुपये इतकी आहे. या कारच्या लुकमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. कंपनीने काही काळापूर्वी याचे फेसलिफ्ट लाँच केले होते. दॅटसनने याची चार मॉडेल्स बाजारात उतरवली आहेत. यामध्ये D,A,T, T(O) यांचा समावेश आहे. रेडी गो पहिल्या प्रमाणेच दोन पेट्रोल इंजिनच्या पर्यायसह उपलब्ध आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत 2020 Datsun Redi-GO च्या लुकमध्ये बदल केले आहे. बाजारात या गाडीची स्पर्धा मारुती आल्टो, रेनॉ क्विड आणि मारुती एस प्रेसो यासारख्या कारशी असेल. 

सावधान! प्ले स्टोअरवरील 17 अॅप्स डाऊनलोड केली असतील तर डिलिट करा

रेनॉ क्विड चे फक्त एकच मॉडेल तीन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. कारच्या स्टँडर्स व्हेरिअंटची किंमत 2 लाख 92 हजार रुपये इतकी आहे. या कारचे इंजिन 800 सीसी असून 54 अश्वशक्ती क्षमता आणि 72 एनएम टॉर्क जनरेट करते. या व्हेरिअंटमध्ये फक्त एकच एअर बॅग मिळते. 

मारुती सुझुकी आल्टो ही भारताची पहिली बीएस6 कार होती. सध्या या कारच्या बेस व्हेरिअंटची किंमत 2 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. तर  Std (O) व्हेरिअंटची किंमत यापेक्षा 5 हजार रुपयांनी जास्त म्हणजेच 2 लाख 99 हजार रुपये इतकी आहे. Std (O) व्हेरिअंट सुद्धा एक चांगला पर्याय होऊ शकते. यात सहकारी प्रवाशासाठीही एअरबॅग मिळते.

 Idea युजर्सना व्होडाफोन देणार Netflix, Amazon Prime चा अॅक्सेस

बीएसचा संबंध एमिशन स्टँडर्डशी आहे. बीस म्हणजे भारत स्टेज असून यामुळे गाडी किती प्रदुषण करते हे समजतं. बीएसच्या माध्यमातून गाड्यांच्या इंजिनमधून निघणाऱ्या धुरामुळे होणाऱं प्रदुषण रेग्युलेट केलं जातं. बीएस नंतर असलेल्या नंबरवरून इंजिन किती प्रदुषण पसरवतं ते ठरवलं जातं. यामध्ये नंबर जसा वाढेल तसं प्रदुषण कमी होणारं इंजिन असतं. यानुसार भारतात बीएस 3, बीएस 4, बीएस 6 गाड्या आहेत. 



from News Story Feeds https://ift.tt/2Vossit

Comments

clue frame