शाओमी ५०० रुपयांत बदलतेय स्मार्टफोनची बॅटरी

नवी दिल्लीः स्मार्टफोनच्या बॅटरीचा परफॉर्मन्स कमी होत चालला आहे, हे आता सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यावेळी आपल्याला फोनची बॅटरी बदलण्याची गरज पडते. त्यामुळे युजर्संला डोळ्यापुढे ठेवून शाओमीने बॅटरी रिप्लेसमेंट प्रोग्रामची सुरुवात केली आहे. या अंतर्गत कंपनी खूपच कमी किंमतीत आपल्या काही निवडक फोन्सची बॅटरी रिप्लेस करीत आहे. वाचाः कंपनी ज्या फोन्ससाठी ही ऑफर घेऊन आली आहे. त्यात काही मॉडल्स जवळपास चार वर्षांपर्यंत जुने आहेत. शाओमीची बॅटरी रिप्लेसमेंटसाठी ४९ युआन (५०० रुपये) चार्ज करीत आहे. स्मार्टफोन्सच्या लिस्टमध्ये Mi 9 आणि Redmi Note 7 यासारख्या मॉडल्सचा समावेश आहे. Mi 9 स्मार्टफोनच्या खराब बॅटरी परफॉरमन्स असल्याने कंपनीवर खूप टीका झाली होती. तर रेडमी नोट ७ सीरिज आपल्या विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. वाचाः ही सेवा केवळ चीनमध्ये कंपनीने हा प्रोग्राम सध्या केवळ चीनमध्ये उपलब्ध आहे. कंपनी अन्य देशात सुद्धा सुरू करण्याची आशा आहे. प्रोग्राम अंतर्गत आणि रेडमीच्या एकूण २० फोनचा यात समावेश आहे. शाओमी Mi 5, Mi 5S, Mi 6, Mi 6X, Mi 8, Mi 8 SE, Mi 8 Youth Edition, Mi 8 Screen Fingerprint Edition, Mi 8 Explorer Edition शाओमी Mi 9, Mi 9 SE, Mi 9 Pro, Mi 9 Explorer Edition, शाओमी Mi Mix 2, शाओमी Mi Mix 2S रेडमी Note 5 रेडमी 6, रेडमी 6A शाओमी रेडमी Note 7, रेडमी नोट 7 Pro आदी फोनचा यात समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VoAh82

Comments

clue frame