चीनच्या हॅकर्सचा प्लान, फार्मा आणि टेलिकॉम कंपन्यावर करु शकतात अटॅक

नवी दिल्लीः चीनचे हॅकर्स भारतावर अटॅक करण्यासाठी प्लान बनवत आहेत. ही माहिती सीमेवर भारत आणि चीन यांच्यात झालेल्या तणावानंतर समोर आली आहे. सायबर इंटेलिजन्स फर्म Cyfirma च्या रिपोर्टनुसार, चीनचे हॅकर्स भारतात वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनवर अटॅक करु शकतात. ज्यात फार्मा पासून टेलिकॉम, मीडिया आणि काही सरकारी वेबसाईट्सचा समावेश आहे. त्यांची योजना वेगवेगळ्या क्षेत्रांना नुकसान पोहोचवण्याची आहे. वाचाः मीडिया कंपनी मनी कंट्रोल सोबत झालेल्या चर्चे नंतर Cyfirma चे संस्थापक कुमार रितेश यांनी सांगितले की, चायनीज हॅकिंग ग्रुप्स आणि कम्यूनिटी मध्ये गेल्या आठवड्यात सीमेवर झालेल्या तणावानंतर भारताला धडा शिकवण्यासाठी हॅकर्सने ही योजना आखली आहे. रिसर्चर्सने सांगितले की, कम्यूनिटी मध्ये हॅकिंग ग्रुप्स भारत सरकारची वेबसाईट, मीडिया, टेलिकॉम कंपन्या, फार्मा कंपन्या, स्मार्टफोन्स पासून कंन्स्ट्रक्शन आणि टायर कंपन्यांपर्यंत लक्ष्य करण्यासाठी आपापासात चर्चा करीत आहेत. अनेक मोठ्या कंपन्या या यादीत रितेश यांनी सांगितले की, डार्क वेबवर फिरत असलेली भारतीय कंपन्यांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. भारताचे मोठे मीडिया ऑर्गनायझेशन शिवाय, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ, एअरटेल, बीएसएनएलचा सुद्धा समावेश आहे. औषधी कंपनीत सिपला आणि सन फार्मास्युटिकल यांच्या नावाचा समावेश आहे. भारतीय फोन मेकर्स मायक्रोमॅक्स आणि इनटेक्ट टेक्नोलॉजी शिवाय एमआरएफ आणि अपोलो टायर चा समावेश आहे. दोन हॅकिंग ग्रुप्स आहेत अॅक्टिव हॅकर्स भारत सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयाच्या वेबसाईट्सवर सुद्धा अटॅक करण्याची शक्यता आहे. दोन चायनीज हॅकर्स ग्रुप्स Gothic Panda आणि Stone Panda असे अटॅक करु शकतात. दोन्ही ग्रुप्स हे पिपल्स रिबरेशन आर्मी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. हॅकर्स वेबसाइट्स आणि प्लॅटफॉर्मची कमतरता शोधत आहेत. याच्या नंतर ते नुकसान पोहोचवतील. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dfxXGu

Comments

clue frame