फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

नवी दिल्लीः केंद्र सरकारकडून ५९ चीनी अॅप्सवर भारतात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. या अॅप्सला प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून युजर्स डाउनलोड करु शकणार नाहीत. सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डेटाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे पाहून केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपल्या फोनमधून चायनीज अॅप्स युजर्संना स्वतः डिलीट करावे लागेल. आपल्या फोनमधून चायनीज अॅप्स हटवायचे असताल तर त्याच्या जागी कोणते अॅप युज करणे चांगले असेल. महाराष्ट्रातील एका डेव्हलपरने एक अॅप तयार केला आहे. याच्या मदतीने चायनीज अॅपची सफाई करण्यासोबतच तुम्हाला त्या फीचर्ससारखे इंडियन अॅप्स डाऊनलोड करता येवू शकते. वाचाः फॉलो करा या स्टेप्स स्टेप 1: सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर जाऊन 'Replace It' सर्च करा. तुम्हाला रेड कलरचा आयकॉनचा अॅप दिसेल. याला इन्स्टॉल करा. स्टेप 2: अॅप ओपन केल्यानंतर काही परवानगी मागितली जाईल. तसेच डिस्क्लेमर दिसेल. याला Allow करा आणि OK करा. स्टेप 3: आता समोर दिसत असलेल्या 'Scan Non-Indian Apps' ऑप्शनवर टॅप करा. आता तुमचा फोन स्कॅन होईल. स्टेप 4: अॅप फोनमध्ये चायनीज अॅप्स दिसतील. त्याला तुम्ही डिलिट करू शकता. तसेच या अॅप्सच्या जागी कोणता इंडियन अॅप तुमच्या कामाला येईल. हेही दिसेल. याला तुम्ही इन्स्टॉल करु शकता. स्टेप 5: शेवटच्या पेजवर तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल. तुम्ही नॉन इंडियन अॅप्सला इंडियन अॅप्सने रिप्लेस केले आहे. जर तुम्ही ठरवले तर या अॅपला होम पेजवर दिले गेलेल्या प्रसिद्ध इंडियन अॅप्स सेक्शन मध्ये जाऊन वेगवेगळ्या गरजेनुसार बनवलेले इंडियन अॅप्सला इन्स्टॉल करु शकता. संपूर्ण यादी पाहू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NDldiw

Comments

clue frame