शाओमीचा इन्व्हर्टरचा पंखा, विना लाईट २० तासांपर्यंत चालणार

नवी दिल्लीः शाओमीची सहकारी कंपनी SMartmi ahs ने एका ड्यूल पर्पज इन्व्हर्टर फॅन लाँच केला आहे. या पंख्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचा वापर टेबल फॅनच्या रुपात करता येऊ शकतो. चीनमध्ये लाँच झालेल्या या पंख्याला Jingdong (JD.com) वरून ७९९ युआन (८६०० रुपये) मध्ये खरेदी करता येवू शकतो. वाचाः ३ इन १ फॅन DC एक वायरलेस पंखा आहे. जो नॅचरली विंड फंक्शनचा वापर करतो. तसेच जास्त आवाज येत नाही. यात देण्यात आलेला पिलर हटवला जाऊ शकतो. म्हणजे, उंची आपल्या हवी तितकी करता येऊ शकते. या फॅनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, या पंख्याला १०० डिग्री पर्यंत फिरवले जाऊ शकतो. तसेच १२० डिग्री पर्यंत डावीकडे आणि उजवीकडे फिरवता येऊ शकते. त्यामुळे हा फॅन ३डी फिरवण्याची क्षमता ठेवतो. वाचाः २० तासांपर्यंत बॅटरी बॅकअप फॅनमध्ये जपानी ब्रशलेस मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे कमी आवाज येतो. हा फॅन खूप वेगाने हवा देतो. पंख्यात ७ फॅन ब्लेड आहे. हा ९ मीटरच्या अंतरपर्यंत हवा फेकतो. याचा विंड आऊटपूट २४.८ घन मीटर-मीटर आहे. पंख्यात लीथियम बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे, की ही बॅटरी २० तासांपर्यंत विजेविना चालू शकते. पंख्याचे वजन ३.७ किलोग्रॅम आहे. या पंख्याला सहज उचलले जाऊ शकते. यात देण्यात आलेल्या रिमोट कंट्रोलवरून सुद्धा ऑपरेट करता येऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30ZlSme

Comments

clue frame