टाईप न करता करा ट्विट, नवीन फिचर लाँच

बॅंकॉक, ता. 18 ः सोशल मीडियावरील एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्‌विटरवर आता आपल्या आवाजातील ट्‌विट करणे शक्‍य होणार आहे. ट्‌विटरने त्यासाठी "व्हॉइस ट्‌विट'ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मजकूर टाइप करण्यापासून आता युजरची सुटका झाली आहे. पहिल्या टप्प्यात काही ठराविक युजरना याचा लाभ घेता येणार असून, हळूहळू सर्वांसाठी हे फिचर वापरता येईल, अशी माहिती ट्विटरने दिली आहे. 

कल्पना नव्हे वास्तव; हजार एचडी चित्रपट क्षणात डाऊनलोड

"ट्विटर'ने म्हटले आहे, की यापूर्वी ट्विटरवर अशा प्रकारे सुविधा नव्हती. युजरला आपले ट्विट टाइप करावे लागत होते. त्यासाठी 280 अक्षरांची मर्यादा होती. त्यामुळे अनेकांना आपल्या भावना व्यक्त करताना अडचणी येत होत्या. त्याचा काही प्रमाणात फटकाही ट्विटरला बसला आहे. त्यामुळे युजरच्या मानवी भावना जपण्यासाठी हे "व्हॉइस ट्‌विट'चे फिचर देण्यात आले आहे. "व्हाइस ट्विट' करण्याची पद्धत जुन्या ट्विट टाइप करायचो त्याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. 

BS-6 वाहने रस्त्यावर येताच बंधनकारक असेल 'हा' नियम

कसे कराल व्हाइट ट्विट 
1) सुरवातीला ट्विट कंपोझर ओपन करावे 
2) तेथील वेवलेंथ आयकॉन टॅप करावा 
3) टॅप केल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू होईल 
4) रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर मधे आपला प्रोफाइल फोटो दिसेल 
5) त्याला टॅप केल्यानंतर तुमचे व्हॉइस ट्‌विट पूर्ण होईल. ते तुम्ही पाठवू शकता. 

मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी

व्हाइस ट्‌विटची वैशिष्ट्ये 
1) 140 सेकंदामध्ये व्हाइस ट्‌विट करता येईल 
2) त्यापेक्षा अधिकही वेळ तुम्हाला ट्‌विट करता येईल; मात्र लगेच दुसरे ट्‌विट सुरू होईल 

इन्स्टा, FB नंतर आता ट्विटरने दिली 'फ्लिट' सुविधा

3) पहिल्याप्रमाणेच आपले हे व्हॉइट ट्‌विट आपल्या प्रोफाइलवर दिसेल 
4) दुसऱ्या ट्‌विटसाठी स्क्रोल केल्यानंतरही पहिले ट्‌विट ऐकता येईल 
5) दुसरे कोणतेही काम करत असताना अशी ट्‌विट तुम्ही ऐकू शकता 

 



from News Story Feeds https://ift.tt/2N6s9EJ

Comments

clue frame