नवी दिल्लीः रिसर्चर्सने ५३ अशा अॅप्सची ओळख पटवली आहे. ज्यांची नजर तुमच्या डेटावर आहे. काही दिवसांआधी टिकटॉक युजर्संची हेरगिरी करीत असल्याने चर्चेत आले होते. आता एका रिसर्चर्सने अशा अॅप्सची ओळख पटवली आहे. ज्यांचा व्यवहार टिकटॉकसारखाच आहे. या सर्व iOS प्लॅटफॉर्मवर रन करणारे अॅप्स आहेत. हे सर्व अॅप आयफोनच्या क्लिपबोर्डवरून डेटा चोरी करीत होते. Ars Technicaच्या एका रिपोर्टनुसार, तलाल हज आणि टॉमी मिस्क नावाचे दोन रिसर्चर्सने मार्च मध्ये या अॅप्सना शोधून काढले होते. त्यानंतर याच्यात काही बदल झाला नाही. हे अॅप बेधडकपणे युजर्संची हेरगिरी करीत आहेत. वाचाः आयडी, पासवर्ड चोरी होण्याचा धोका रिपोर्ट्च्या माहितीनुसार, या अॅप्समुळे आयडी आणि पासवर्ड यासारखी संवेदनशील माहिती चोरी केली जाऊ शकते. हे अॅप्स फोनच्या सेव्ड क्लिपबोर्डचा डेटाची हेरगिरी करते. त्यामुळे युजर्संचा आयडी व पासवर्ड चोरी केला जाऊ शकतो. रिसर्चर्सच्या रिपोर्टनुसार, या अॅप्सच्या कार्यशैलीत कोणताही बदल डेव्हलपर्सकडून करण्यात आलेला नाही. वाचाः या गेमिंग अॅप्सवर हेरगिरीचा आरोप 8 बॉल पूल अमेज बीज्वेल्ड ब्लॉक पजल क्लासिक बीज्वेल्ड क्लासिक बीज्वेल्ड HD फ्लिप द गन फ्रूट निंजा गोल्फमार्स्टर्स लेटर सूप लव निक्की माई एमा प्लेनेट Vs जॉम्बी हीरोज पूकिंग मोबाइल टॉम्ब ऑफ द मास्क टॉम्ब ऑफ द मास्क: कलर टोटल पार्टी किल वॉटरमारबलिंग वाचाः सोशल नेटवर्किंग अॅप्सचीही तुमच्या डेटावर नजर टिकटॉक टुटॉक टॉक वाइबर वीबो जूस्क वाचाः हेही अॅप्स धोकायदाय 10% हॅप्पियर: मेडिटेशन 5-0 रेडियो पुलिस स्कॅनर एक्यूवेदर अली एक्सप्रेस शॉपिंग अॅप बेड बाथ अँड बियॉन्ड डैज्न होटल.कॉम होटल टुनाइट ओवरस्टॉक पिगमेंट रिकलर कलरिंग बुक टु कलर स्काई टिकट द वेदर नेटवर्क अन्य अॅप्सवरही हेरगिरीचा आरोप रिपोर्टमध्ये ज्या अॅप्सची यादी जारी करण्यात आली आहे. त्यात न्यूज अॅपचाही समावेश आहे. हे न्यूज अॅप iOS यूजर्सच्या क्पिपबोर्डच्या सेव्ड डेटावर नजर ठेवतात. त्यामुळे युजर्संचा सेन्सिटिव डेटा धोक्यात पडू शकतो. या न्यूज अॅप्समध्ये जगभरातील अनेक मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eHZNwL
Comments
Post a Comment