शाओमीने ४ मिनिटात विकले २१ कोटींचे स्मार्ट टीव्ही

नवी दिल्लीः स्मार्टफोन प्रमाणे टीव्ही सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने मार्च मध्ये ९८ इंचाचे डिस्प्लेचा लाँच केला होता. मोठ्या साईजच्या टीव्हीची किंमत १९,९९९ युआन (२,१५,००० रुपये) होती. इतकी जास्त किंमत असूनही टीव्हीवरून खूप उत्सूकता होती. या टीव्हीचे १००० युनिट्स केवळ ३ मिनिट २८ सेकंदात विकले आहेत. वाचाः रिपोर्टनुसार, शाओमीने चार मिनिट पेक्षा कमी वेळात एका प्रोडक्टची विक्री १९,९९९,००० युआन (जवळपास २१ कोटी रुपये) कमावले आहे. टीव्हीत तुम्हाला स्मूद अॅनिमेशनसाठी MEMC मोशन कंम्पोजिशन १२ एनएम प्रोसेसर आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. वाचाः टीव्हीचे वैशिष्ट्ये काय ? टीव्हीत ९८ इंचाचा ४ के डिस्प्ले आणि ४ जीबी रॅम मिळते. कंपनीचा दावा आहे की, टीव्हीच्या डिस्प्लेत एक सिंगल बॅडपेक्षाही १३ टक्के जास्त आहे. हा एक टेनिस बोर्ड इतका आहे. टीव्हीत कंपनीचे XiaoAI व्हाईस असिस्टेंट देण्यात आले आहे. यावरून तुम्ही अन्य स्मार्ट डिव्हाईसने कंट्रोल करू शकता. स्पेशल कारने होते डिलिव्हरी कनेक्टिविटीसाठी यात HDMI पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स, एक केबल टीव्ही अँटिना पोर्ट, स्पीकर व सेट टॉप बॉक्स साठी पोर्ट्स देण्यात आले आहे. टीव्हीची डिलिव्हरी ३० दिवसात होते. तसेच टीव्हीला इन्स्टॉल करण्याआधी कंपनीचा एक सर्वे केला जातो. त्यानंतर टीव्ही इन्स्टॉल केले जाते. या टीव्हीची डिलीव्हरी करण्यासाठी एका स्पेशल कारने होते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31m7Co1

Comments

clue frame