जिओचे धमाकेदार डेटा पॅक, ५१ रुपयांपासून सुरू, २४० जीबी पर्यंत डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स नेहमी आपल्या ग्राहकांच्या हिशोबाप्रमाणे वेगवेगळ्या कॅटेगरीतील प्रीपेड प्लान उपलब्ध करून देते. कंपनीने नुकतीच ४०१ रुपये, २५९९ रुपये, आणि २३९९ रुपयेचा प्रीपेड पॅक लाँच केला आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ कडे डेटा अँड डेटाची हवी तितकी गरज पूर्ण करण्यासाठी डेटा पॅक उपलब्ध आहेत. जर तुम्हाला इंटरनेट जास्त खर्च करण्याची गरज असेल तर तुम्हाला अतिरिक्त डेटा हवा असेल तर डेटा अँड अॅड पॅक उपलब्ध आहेत. वाचाः १२०८ रुपयांचा जिओ डेटा अॅड ऑन पॅक जिओच्या या डेटा अॅड ऑन पॅकची किंमत १२०८ रुपये आहे. या पॅकची वैधता २४० दिवस आहे. या पॅकमध्ये एकूण २४० जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. ३० जीबी डेटा प्रत्येक वेळी मिळतो. तसेच त्यानंतर डेटा स्पीड कमी होऊन 64Kbps होतो. जिओच्या या पॅकमध्ये व्हाईस किंवा एसएमएस बेनिफिट मिळत नाही. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टारचे १ वर्षापर्यंत सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये मिळते. वाचाः १२०६ रुपयांचा डेटा अॅड ऑन पॅक जिओच्या या पॅकची वैधता १८० दिवस आहे. यात एकूण २४० जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन 64Kbps होते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते. जिओच्या या पॅकमध्ये ३९९ रुपयांच्या किंमतीचे डिज्नी प्लस हॉटस्टारचे एका वर्षापर्यंत फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. १००४ रुपयांचा जिओ डेटा अॅड ऑन पॅक जिओचा १००४ रुपयांच्या पॅकची वैधता १२० दिवसांची आहे. या पॅकमध्ये एकूण २०० जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. १ वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः ६१२ रुपयांचा जिओ डेटा अॅड ऑन पॅक जिओचा ६१२ रुपयांच्या पॅकमध्ये कंपनी ५१ रुपयांचे १२ व्हाऊचर्स उपलब्ध करून देते. प्रत्येक व्हाऊचर्सची वैधता ही युजरच्या प्रीपेड प्लान इतकी असते. एका व्हाऊचरमध्ये ६ जीबी डेटा मिळतो. ६ जीबी डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. व्हाऊचरमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ५०० मिनिट मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. १ वर्षापर्यंत डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YA2J8N

Comments

clue frame