नवी दिल्लीः जगभरात सर्वात मोठा अँड्रॉयड डिव्हाईसेजचा आहे. गुगल, सॅमसंग, यासारख्या ब्रँड्सच्या डिव्हाईसेज बजेट पासून प्रीमियम सेगमेंट पर्यंत प्रसिद्ध आहेत. जर तुम्ही सुद्धा काही अँड्रॉयड स्मार्टफोन्सचा वापर करीत असाल तर काही अॅप्स इन्स्टॉल करण्याआधी अलर्ट राहणे गरजेचे आहे. नवीन रिपोर्ट्मध्ये युजर्सला असे ४७ अॅप्स डिलीट करण्याची सूचना करण्यात आली आहे. जे प्ले स्टोरवर गेम्ससारखे दिसतात परंतु, धोकादायक आहेत. वाचाः अँटी व्हायरस कंपनी Avast च्या रिसर्चर्सने अँड्रॉयड युजर्सला असे ४७ धोकादायक अॅप्ससंबंधी अलर्ट केले आहे. जे गुगल प्ले स्टोरवर गेम्सच्या नावाने उपलब्ध आहेत. रिसर्चर्सच्या माहितीनुसार, 'HiddenAds' अॅप नॉर्मल गेम्स प्रमाणे प्ले स्टोरवर दिसते. परंतु, यात अॅडवायर टेक्नोलॉजी लपवली आहे. ज्याच्या मदतीने डिव्हाईसमध्ये खूप सारे अॅड दिसतात. इन्स्टॉल केल्यानंतर लपलेले अॅडवेअर अॅक्टिव होतात. डिव्हाईसमध्ये खूप अॅड दिसणे सुरू होतात. त्याचा परिणाम परफॉर्म्स आणि बॅटरीवर पडतो. १.५ कोटीहून अधिक डाऊनलोड चिंतेची बाब म्हणजे या अॅप्सला १.५ कोटी वेळी डाऊनलोड करण्यात आले आहे. याशिवाय, यात ३७ अॅप्स अजूनही गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. अवास्टच्या थ्रेट अॅनालिस्ट जाकूब वावरा यांनी म्हटले की, हिडेन अॅड्स यासारखी मोहीम गुगल प्ले स्टोरवर आपली ओळख लपवण्यात जागा बनवते. युजर्सकडून डाऊनलोड करण्यात आल्यानंतर हे हळू हळू आपले मॅलिशस अॅक्टिवेट करतात. असे अॅडवेयर मोहीमला रोखणे कठीण होऊन जाते. कारण, वेगवेगळे अॅप्स डेव्हलपर्स अकाउंट्सचा वापर करतात. वाचाः डिलीट करणे सोपे नाही रिसर्चर्सच्या अॅनालिसिसच्या माहितीनुसार, असे अॅप्स युजर्सच्या फोनमधून आपले आयकॉन्स हाईड करू शकत होते. याला डिलीट करणे सोपे नाही. याशिवाय, ७ अॅप्स युजर्संच्या फोनच्या ब्राऊजर्सला ओपन करु शकतात. अतिरिक्त अॅप्स डिस्प्ले करु शकते. म्हणजेच अॅपला डिव्हाईसमधून डिलीट केल्यानंतर अॅड्स दिसणे सुरू राहते. रिसर्च मधून हेही समोर आले आहे की, या अॅप्सला तात्काळ डिलीट करण्यास सांगितले आहे. अवास्ट रिसर्चर्स कडून शेअर करण्यात आलेल्या यादीत प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. Draw Color by Number Skate Board - New Find Hidden Differences Shoot Master Stacking Guys Disc Go! Spot Hidden Differences Dancing Run - Color Ball Run Find 5 Differences Joy Woodworker Throw Master Throw into Space Divide it - Cut & Slice Game Tony Shoot - NEW Assassin Legend Flip King Save Your Boy Assassin Hunter 2020 Stealing Run Fly Skater 2020 वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2B7GYEx
Comments
Post a Comment