चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी

नवी दिल्ली, ता. १९ (पीटीआय): भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू असल्याने भारतीय नागरिक चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत. यादरम्यान भारतीय गुप्तचर संस्थेने भारत सरकारला चीनचे ५२ मोबाईल ॲप्स ब्लॉक करण्याचे आणि त्याचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. गुप्तचर संस्थेच्या मते, चीनचे हे ५२ ॲप्स सुरक्षित नसून, ॲप्स वापरणाऱ्याचा डेटा भारताबाहेर संग्रहित केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील हे ॲप्स धोकादायक आहेत.

कल्पना नव्हे वास्तव; हजार एचडी चित्रपट क्षणात डाऊनलोड

एका अहवालानुसार चीनच्या या ५२ ॲप्समध्ये सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म टिकटॉक, बिगो लाइव्ह, फाईल शेअरिंग सर्व्हिस शेअरइट, यूसी ब्राऊजर, इ कॉमर्स प्लॅटफॉर्म शीन आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, सध्याच्या काळात गुप्तचर संस्थेने केलेल्या शिफारशींवर राष्ट्रीय सुरक्षा परिषद सकारात्मक विचार करत आहे. यावर आतापर्यंत निर्णय घेतला नसला तरी, राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे नमूद केले. 

मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी

चीनचे ॲप्स भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आणि हानिकारक असल्याचे गुप्तचर संस्थेने सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. गुप्तचर संस्थेने केलेल्या शिफारशींवर चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक ॲप्सची तपासणी केली जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्यावर बंदी घातली जाईल, असे सांगितले.

इन्स्टा, FB नंतर आता ट्विटरने दिली 'फ्लिट' सुविधा

 चीनचे वादग्रस्त ॲप्स 
टिकटॉक, वॉल्ट हाइड, विगो व्हिडिओ, बिगो लाइव्ह वेबिबो 
वुई चॅट, शेअरइट, यूसी न्यूज, यूसी ब्राऊजर 
ब्यूटी प्लस, झेंडर, क्लब फॅक्टरी, हॅलो, लाइक 
कवाई, रोमवुई, शिन, न्यूजडॉग, फोटो वंडर 
अप्यूस ब्राऊजर, विवा व्हिडिओ, क्यूयू व्हिडिओ इंक 
परफेक्ट कॉर्प्स, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर (हाय सिक्युरिटी लॅब) 
एमआय कम्युनिटी, डीयू रेकॉर्डर, युकॅम मेकअप 
एमआय स्टोअर, ३६० सिक्युरिटी, डीयू बॅटरी सेव्हर, डीयू ब्राऊजर 
डीयू क्लिनर, डीयू प्रायव्हसी, क्लिन मास्टर, चिता 
कॅचे क्लिनर, डीयू ॲप्स स्टुडिओ, बायडू ट्रान्सलेट, बायडू मॅप 
वंडर कॅमेरा, ईएस, फाइल एक्सप्लोझर, क्यू क्यू इंटरनॅशनल 
क्यू क्यू लॉंचर, क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर, क्यू क्यू प्लेअर, क्यू क्यू म्युझिक 
क्यू क्यू मेल, क्यू क्यू न्यूजफीड, वुइसिंक, सेल्फी सीटी, क्लॅश ऑफ किंग्ज 
मेल मास्टर, एमआय व्हीडिओ, कॉल झिओमी, पॅरलल स्पेस 

आता इंग्रजी शिका घरबसल्या तेही एका क्लिकवर!

चीनचे ५२ ॲप्स गुगलच्या प्ले स्टोअरवर आणि ॲपलच्या आयओएस ॲप स्टोअरवर उपलब्ध आहेत. गुप्तचर खात्याने चीनच्या ॲप्ससंदर्भात इशारा दिल्याने वादग्रस्त ॲप्स न वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. 

 



from News Story Feeds https://ift.tt/2YfsDP5

Comments

clue frame