चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन

नवी दिल्लीः मायक्रोमॅक्स, कार्बन आणि यासारख्या कंपन्या चीनी स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देण्याची तयारी करीत आहे. भारतीय कंपन्याचे प्रोडक्ट इनोव्हेशन आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीवर मोठी गुंतवणूक करण्याची गरज आहे, असे जाणकारांचे मत आहे. त्यांनी म्हटले, अँटी चायना सेंटिमेंट मुळे फार मोठा फायदा होणार नाही. या कंपन्यांना मोठी प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. या तिन्ही कंपन्या १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील फोन लाँच करुन बाजारात पुनरागमन करीत आहेत. वाचाः चिनी कंपन्यांचा दबदबा भारतीय फोन बाजारात सध्या चिनी कंपन्यांची मक्तेदारी आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या रिपोर्टनुसार, जानेवारी ते मार्च २०२० च्या तिमाहीत भारतीय कंपन्यांची भागीदारी केवळ १ टक्के राहिली आहे. तर चिनी कंपन्यांची भागीदारी ८१ टक्के राहिली आहे. काउंटरपॉइंट रिसर्चचे सहायक संचालक तरुण पाठक यांनी म्हटले की, स्थानिक कंपन्यांची ग्रोथ करण्यासाठी रिसर्च व डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात सुधार करण्याची गरज आहे. स्थानिक कंपन्यांना एन्ट्री लेवल युजर्संला बाहेरून पाहण्याची आणि सॉफ्टवेअर लेवलवर काम करण्याची गरज आहे. वाचाः डिझाईनमध्ये लावा आहे पुढे आयडीसीच्या रिसर्च संचालक असलेले नवकेंद्र सिंह यांनी म्हटले की, स्थानिक कंपन्यांचे पुनरागमन कठीण आहे. त्यांना भारत सरकारकडून प्रोत्साहन किंवा स्वस्त फंड यासारख्या सपोर्टची गरज आहे. नाही तर त्या कंपन्या मार्केटिंग आणि खर्चात चिनी कंपन्यांना टक्कर देऊ शकत नाही. TechArc चे फाउंडर अॅनालिस्ट फैसल कावोसा यांनी सांगितले, १० हजार रुपये आणि त्यापेक्षा जास्त किंमतीच्या सेगमेंटमध्ये भारतीय कंपन्या स्वीकारण्याच्या पलिकडे आहेत. डिझाईनमध्ये भारतीय कंपन्यांत लावा इंटरनॅशनल बाकीपेक्षा पुढे आहे. लावा आपली एक्सपोर्ट मॅन्यूफॅक्चरिंग बेस, आर अँड डी आणि डिझाईनला चीनवरून भारतात शिफ्ट करण्याची योजना बनवत आहे. यासाठी कंपनी ८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31cQGjC

Comments

clue frame