टिकटॉक स्टार्स सहन करणार लाखोंचे नुकसान, वापरणार टिकटॉकला 'हा' पर्याय...

केंद्र सरकारने लोकप्रिय असलेले ५९ चिनी ॲपवर बंदी घातली आहे. त्यातील टिकटॉक ॲप हे तर लहानांपासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना वेड लावले आहे. टिकटॉक ॲप काही दिवसातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ (अ) च्या तंर्गत ॲपवर ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने हे ॲप्स धोकादायक असल्याने ५९ चिनी मोबाइल ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी टिकटॉक स्टार यांचा वेळ कसा जाणार... रोज न चुकता अनेक व्हिडीओ तयार करुन टिकटॉकवर पोस्ट करना-या स्टार्सचे काय होणार. यानंतर त्यांनी कोणता पर्याय निवडला असेल असे प्रश्न भेडसावत असतीलच.

 शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणाईंमध्ये पहायला मिळत होती. मात्र टिकटॉक युजर्सच्या चिंतेत वाढ झाली आहे. लाखो टिकटाॅक युजर्स चिंतेत बसले आहेत. आता या तरुणांईना टिकटॉक ॲपवर बंदी घालण्यात आल्यामुळे टिकटॉक स्टार्स यांच्यावर  मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच काही स्टार्सवर आता बेरोजगारी ओढावणार आहे. विशेष म्हणजे टिकटॉक वापरणाऱ्यांमध्ये छोटी शहरं आणि गावाखेड्यातील लोकांची संख्या मोठी आहे.

या टिकटॉक ॲपमुळे अनेकांची लाखो रुपयांची कमाई  केली आहे. त्यात अनेक टिकटाॅक स्टार्संची लाखोंनी फॉलोअर्स आहेत. आणि काही दिवसांतच अनेकजण स्टार झाले आहेत. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे सात-आठ वर्षांच्या मुलांमध्येही टिकटॉकची क्रेझ सुरू आहे. विशेषतः छोटी शहरं आणि गावातील लोकांसाठी उत्तम व्यासपीठ म्हणून याकडे बघितलं जातं होतं. अनेक जण या अॅपवरून आपले छंद पूर्ण करतात. 

मोदी सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे टिकटॉक प्रेमींची सध्या काय स्थिती झाली असेल. भारतातील लाखो टिकटॉक सुपरस्टार रात्रीतून बेरोजगार झाले असतील. सरकारने घेतलेला हा  निर्णय टिकटॉक सुपरस्टार्संवर कसा परिणाम केला असेल. टिकटॉक ॲप सुरु झाल्यापासून अनेक तरुणाईना वेड लागले होते. रोज न चुकता वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आणि आपले फालोअर्स वाढवायचे. टिकटॉक स्टार्संचे फालोअर्सची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली होती.

काहीजण टिकटॉकच्या माध्यमातून आपली कला सादर करुन अनेकांना नवनवीन माहिती सांगत हेाते. म्हणजेच मनोरंजनात्मक व्हिडिओ, शिक्षणसंदर्भातील व्हिडिओ, आरोग्याची काळजी तसेच महत्त्वाचे काही आरोग्यटिप्ससंदर्भातील व्हिडिओ, जगभरातल्या पर्यटनसंदर्भातील माहिती तयार केलेला व्हिडिओ, अशा अनेक व्हिडिओमध्ये रोज नव्याने टिकटॉकवर शेकडो व्हीडीओ तयार होत असतात. त्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात लाइक, कमेंट्स ही मिळत होते. परंतु आता हे सर्व बंद होईल आणि प्लॅटफॉर्म बंद होईल, यांचं अनेकांना वाईट वाटत आहे.

यावेळी या विषयावर बोलताना लक्ष्मीकांत कांबळे म्हणाले की, मी गेल्या दोन वर्षापासून टिकटॉकवर आहे. माझे फालोअर्सही भरपूर आहेत. केंद्रसरकारने चिनी ॲपवर जी बंदी घातली आहे. ती आपल्या भारत देशाच्या सुरक्षेसाठी केलीच आहे. एकिकडे ॲप वर बंदी घातल्यामुळे वाईट वाटत आहे, परंतु त्याला पर्याय म्हणून आम्ही आता भारताचे रोपो ॲप सुरु करणार आहे. 

यावेळी अपर्णा मोरे म्हणाल्या की, मी टिकटॉक  ॲपवर अनेक नवनवीन व्हिडिओ तयार करत होते. मला टिकटॉकवर अनेक फालोअर्स आहे. टिकटॉकमुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाली होती. यामुळे उत्तम असा प्लॅटफार्म मिळाला होता. परंतु आता केंद्रसरकरने या ॲपवर बंदी घातली आहे. याचे वाईट वाटत आहे. यानंतर आमची कला सादर करायची इच्छा झाल्यास त्याला दुसरा पर्याय निवडावा लागेल असे वाटत आहे



from News Story Feeds https://ift.tt/2YK6ngB

Comments

clue frame