सॅमसंग घेऊन येतेय दोन स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः Samsung आपले नवीन स्मार्टफोन आणि वर काम करीत आहे. एका नवीन लिक रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए51एस 5G चा मॉडल नंबर SM-A516V तर गॅलेक्सी ए71एस 5G चा मॉडल नंबर SM-A716V आहे. हे दोन्ही मॉडल नंबर बेंचमार्किंग वेबसाईटवर गीकबेंचवर दिसत आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही हँडसेटचे खास वैशिष्ट्ये गीकबेंचवर लिस्टिंग केले आहेत. हे दोन्ही फोन मध्ये अँड्रॉयड १० आणि क्वॉलकॉम प्रोसेसर असू शकतो. वाचाः वर Samsung Galaxy A51s 5G ला अँड्रॉयड १० सोबत लिस्ट करण्यात आले आहे. तसेच या लिस्टिंगनुसार फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज फ्रीक्वेंसी सोबत क्वॉलकॉम प्रोसेसर असल्याची माहिती समोर येत आहे. मदरबोर्डला 'Lito' नावाने लिस्ट करण्यात आले आहे. स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरसाठी वापरला जाणारा कोडनेम आहे. या फोनमध्ये ६ जीबी रॅम दिला जाऊ शकतो. वाचाः याप्रमाणे बेंचमार्किंग साईटवर सॅमसंग गॅलेक्सी A71 5G ला सुद्धा अँड्रॉयड १० सॉफ्टवेअर स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर सोबत लिस्ट करण्यात आले आहे. गॅलेक्सी ए71 मध्ये ८ जीबी रॅम देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या मॉडलला सिंगल कोर मध्ये ६२६ तर मल्टी स्टोर कोर टेस्टमध्ये १९६३ पॉइंट मिळाले आहेत. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी ए ५१ एस ५जी आणि गॅलेक्सी ए71एस 5G मॉडल्स संबंधी पहिल्यांदा माहिती समोर आली आहे. गीकबेंच लिस्टिंग फेक पण होऊ शकते, त्यामुळे वाचकांनी यावर किती विश्वास ठेवायचा हे त्यांनीच ठरवायचे आहे. याआधी गॅलेक्सी ए५१ ५जी, आणि गॅलेक्सी ए७१ ५जी ला एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZhIM65

Comments

clue frame