नवी दिल्लीः Flipkart वर पुन्हा एकदा बिग सेव्हिंग डेज सेलला सुरुवात होणार आहे. देशातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टवर २३ जून ते २७ जून या दरम्यान 'BIG SAVING DAYS' सेल मध्ये एचडीएफीसी बँक कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. फ्लिपकार्टवर क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वरून कमीत कमी ४९९९ रुपयांच्या खरेदीवर १५०० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट आणि डेबिट कार्डवरून खरेदी केल्यानंतर ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. वाचाः सुपर सेव्हिंग ऑफर्स अंतर्गत मोबाइल आणि टॅबलेट वर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे. विवो झेड वनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा फोन १९ हजार ९९० रुपयांऐवजी १४ हजार ९९० रुपये आणि आयफोन ७ प्लस ३७ हजार ९०० रुपया ऐवजी ३४ हजार ९९९ रुपये, एमआय मॅक्सचा ६ जीबी स्टोरेजचा फोन ३७ हजार ९९९ रुपया ऐवजी १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तसेच ओप्पो ए९ २०२० स्मार्टफोन १८ हजार ९९० रुपयांऐवजी १२ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमाय, कार्डलेस क्रेडिट आणि एक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येत आहे. वाचाः टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर सुद्धा या फ्लिपकार्ट सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय, कंप्लिट अप्लायसेंज प्रोटेक्शन आणि एक्सचेंज ऑफर मध्ये खरेदी करण्याची संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्ससरीज कॅटिगरीत हेडफोन आणि स्पीकर्स वर ६० टक्क्यांपर्यंत सूट, स्मार्टवॉच आणि बँड्सवर ६० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. ई कॉमर्स कंपनी बेस्ट सेलिंग लॅपटॉपवर ४० टक्के सूट ऑफर केली जात आहे. या प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स लागू आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BoW8oC
Comments
Post a Comment