खरंच पृथ्वीचा विध्वंस करू शकतात का Asteroid ? जाणून घ्या

अंतराळात काय सुरु आहे आणि काय हालचाल होते याकडे प्रत्येक देशाचं लक्ष असतं. त्यातही अनेकदा अशीही माहिती समोर येत असते की एखादा लघुग्रह किंवा उल्का पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. डायनासोर सारख्या प्राण्यांची पूर्ण प्रजाती नष्ट करणाऱ्या या लघुग्रहांचा आजच्या काळात पृथ्वीला किती धोका आहे? लघुग्रहांचे नाव ऐकताच अनेक प्रश्न समोर येतात. अंतराळात फिरणारे सगळेच लघुग्रह विध्वंसक असतात का? याशिवाय इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

अॅस्टेरॉइड म्हणजे लघुग्रह हे असे डोंगर किंवा भाग असतात जे इतर ग्रहांप्रमाणे सुर्याभोवती फिरत असता. पण ते आकाराने खूपच लहान असतात. आपल्या सौरमंडळामध्ये जास्तीजास्त लघुग्रह हे मंगळ आणि गुरु ग्रहाच्या कक्षेत आढळतात. याशिवाय इतर ग्रहांच्या कक्षेतही ते फिरत असतात. जवळपास 4.5 अब्ज वर्षांपुर्वी जेव्हा सौरमंडळ तयार झालं त्यावेळी हवा आणि धुळीमुळे जे काही भाग ग्रहांचा आका घेऊ शकले नाहीत आणि मागे राहिले तेच हे लघुग्रह. यामुळेच इतर ग्रहांप्रमाणे यांचा आकार गोल असत नाही. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की एव्हरेस्टच्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार आहे तर कधी फुटबॉलच्या आकाराचा. अंतराळात असे अनेक लघुग्रह आहेत जे विशालकाय आहेत. 

एका सूर्यग्रहणामुळे आइन्स्टाईन झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ

पृथ्वीवर विध्वंस करण्यासाठी लघुग्रहांचा फक्त आकार महत्वाचा  नाही. जर कोणताही लघुग्रह पृथ्वीपासून जवळ 46 लाख मैल अंतरावर येण्याची शक्यता असते तेव्हाच पृथ्वीला धोका असतो असं अंतराळ संस्था मानतात. नासाची सेन्ट्री सिस्टिम अशा प्रकारच्या धोक्यांवर लक्ष ठेवून असते. या सिस्टिमच्या म्हणण्यानुसार लघुग्रहापासून पृथ्वीला धोक्याची शक्यता आहे ती सुद्धा आतापासून 850 वर्षे पुढे म्हणजेच 2880 साली. न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगएवढा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची शक्यता आहे. मात्र वैज्ञानिकांना विश्वास आहे की येणाऱ्या काळात प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टिम विकसीत करण्यात येईल ज्यावर काम सुरू झाले आहे. 

गुरूत्त्वीय लहरींद्वारे पुन्हा 'आइन्स्टाईन'च्या सिद्धांतांची परीक्षा

उल्कापिंड आणि लघुग्रह यामध्ये काय फरक असतो असंही अनेकदा वाटतं. तर लघुग्रहाचाच एक भाग उल्का असतात. कोणत्या तरी कारणामुळे लघुग्रहापासून तुटून त्याचा लहान तुकडा तयार होतो. त्याला उल्कापिंड असं म्हणतात. जेव्हा ही उल्का पृथ्वीच्या जवळ पोहोचते तेव्हा हवेच्या वातावरणात आल्यानंतर जाळ होत आणि आपल्याला एक प्रकाश तुटणाऱ्या ताऱ्यासारखा दिसतो. मात्र हे तारे किंवा धुमकेतुही नसतात. धुमकेतुसुद्दा लघुग्रहाप्रमाणे सुर्याभोवती फिरत असतात.नासाने पृथ्वीवर पडलेल्या अशा अनेक उल्कांचा संग्रह केला आहे. याचा अभ्यास करून लघुग्रह, ग्रह आणि सौरमंडळाचा अभ्यास केला जातो.

 



from News Story Feeds https://ift.tt/2NLozQo

Comments

clue frame