नवी दिल्ली - गुगलने नुकतंच 36 कॅमेरा अॅप्स प्ले स्टोअरवरून डिलीट केली आहेत. याधील अनेक कॅमेरा अॅप्स रिमूव्ह कऱण्याआधी लाखो लोकांनी डाऊनलोड केली होती. व्हाइट अॅप्स थ्रेट इंटेलिजन्स अॅन्ड रिसर्चच्या टीमच्या एका अहवालानुसार स्कॅमर्सनी जवळपास दर 11 व्या दिवशी नवीन अॅप डेव्हलप केलं. या अॅप्सला 17 दिवसांच्या आतच रिमूव्ह करण्यात आलं आहे. ही अॅप्स युजर्सच्या प्रायव्हसीसाठी धोकादायक होती. त्यामुळे प्रायव्हसी सुरक्षित ठेवायची असेल तर कोणतंही धोकादायक अॅप तुमच्या मोबाइलवर डाऊनलोड करू नका. अशी अॅप्स कशी ओळखायची याच्या काही टिप्स वाचा.
गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान
सर्वात आधी तुम्ही कोणत्याही अॅप डेव्हलपर्सचा कॉन्टॅक्ट अॅड्रेस चेक करायला हवा. फेक अॅप्सच्या डेव्हलपर्सचा इमेल अॅड्रेस जीमेल किंवा याहूशी जोडलेला असतो. जर कोणत्याही अॅपची कॉन्टॅक्ट इन्फर्मेशन नसेल तर अशी अॅप डाऊनलोड करणं टाळा.
चीनच्या ५२ अ््रॅपपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी
फेक अॅप्सचे प्रमाणही प्ले स्टोअरवर जास्त आहे. यांच्याशी संबंधित डिस्क्रिप्शनमध्ये अनेक लहान मोठ्या चुका असतात. एखाद्या ओरिजनल अॅपचे डिस्क्रिप्शन योग्य पद्धतीने आणि सविस्तर लिहिलेले असते. अशा प्रकारे तुम्हीही फेक आणि ओरिजनल अॅपमधील फरक ओळखू शकता.
मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी
गुगल प्ले स्टोअरवर असलेली अॅप्स व्हेरिफाय केली जातात. त्यामध्ये व्हेरिफाइड बाय प्ले प्रोटेक्ट असा मार्क असतो. तो असल्यास अॅप्लिकेशन डाऊनलोड कऱणं सुरक्षित असतं. कोणतंही अॅप डाऊनलोड कऱण्याआधी हा मार्क चेक करा.
MI Band 5 लाँच; 11 स्पोर्ट्स मोड असलेला बँड भारतात कधी?
तुम्ही कोणंतही अॅप डाऊनलोड केलं आहे तर तुम्हाला माहिती नाही की हे अॅप खरं आहे की फेक. तर तुम्हाला त्या अॅपमुळे फोनचा किती डेटा आणि बॅटरी युज होते हे पाहिले पाहिजे. फेक अॅपमुळे जास्त डेटा आणि बॅटरी संपते.
from News Story Feeds https://ift.tt/37TM5nF
Comments
Post a Comment