Apple ची iPhone साठी नवी सिस्टिम, iOS 1 नंतर पहिल्यांदाच केला हा बदल

नवी दिल्ली - अॅपलने WWDC 2020 ऑनलाइन इव्हेंटमध्ये लेटेस्ट मोबाइल ऑपरिटिंग सिस्टिम लाँच केली आहे. iOS 14 अशी ही सिस्टिम असून नव्या व्हर्जनमध्ये इंटरफेसपासून नव्या फीचर्सपर्यंत अनेक बदल कऱण्यात आले आहेत. i Phone युजर्सना अॅप लायब्ररी ते होम विजेटसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कंपनीचे iOS अपडेट त्या सर्व आयफोन युजर्सना मिळेल ज्यांच्याकडे iOs 13 सिस्टिम असलेला फोन आहे.

App Library च्या माध्यमातून सर्व अॅप्स एका फोल़्डरमध्ये ठेवता येणार आहे. या फोल्डर्सना राइट स्वाइप करून ओपन करता येईल. याशिवाय कोणतंही अॅप हाइड करण्याची सोयही दिली आहे. अॅप लायब्ररीमध्ये सर्च बारचा पर्याय आहे. अनेक अॅप्समधून कोणतंही अॅप शोधता येईल. 

गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान

Widgets: पहिल्यापेक्षा विजेट्स चांगल्या पद्धतीने सेट करता येणार आहेत. यामध्ये होम स्क्रीनवरसुद्धा अॅड करण्याचा पर्याय दिला आहे. यासह तुम्ही आयफोनच्या स्क्रीनचे डिझाइन पूर्णपणे बदलू शकता. iOS 1 पासून आतापर्यंत होम स्क्रीन एकसारखीच होती. त्यात आता पहिल्यांदाच बदल होणार आहे. 

Picture in Picture: आयफोनमध्येही इंटरफेसमध्ये पिक्चर इन पिक्चर मोडही आला आहे. यामध्ये तुम्ही अॅप मिनिमाइज केल्यानंतरही तुम्ही लहान विंडोमध्ये व्हिडिओ पाहू शकता. हे फीचर आतापर्यंत फक्त iPad मध्ये दिलं होतं. 

चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी

Siri new Design: अॅपलच्या व्हर्च्युअल असिस्टंट सिरीला नवीन डिझाइन दिलं आहे. यामध्ये ट्रान्सलेट अॅपचा सपोर्टही आहे. हे ट्रान्सलेट अॅप ऑफलाइन वापरता येतं तसंच अनेक भाषांना सपोर्ट करतं. 

updated Messages: अॅपलने मेसेज अॅपही अपडेट केलं आहे. यामध्ये पिन मेसेजचा ऑप्शन दिला आहे. याशिवाय नवीन इमोजी आणि रिप्लाय करताना मेन्शन करण्याचं फीचरही दिलं आहे. 

मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी

new Apple Maps: अॅपल मॅप्समध्ये गाइडेड आणि सायकलिंग डायरेक्शनचे फीचर मिळेल. आता यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी बेस्ट रूट दाखवला जाईल. जिथं चार्जिंग स्टेशन असतील तेसुद्धा दिसतील.



from News Story Feeds https://ift.tt/2VbpJci

Comments

clue frame