ओप्पोचा लोकप्रिय स्मार्टफोन आता 3 हजार रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली -  ओप्पोने त्यांच्या स्मार्टफोनची किंमत 3 हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. गेल्याच वर्षी ओप्पोने सप्टेंबर महिन्यात Oppo A9 2020 चे बेस व्हेरिअंट लाँच केलं होतं. 4 जीबी रॅम असलेल्या या स्मार्टफोनची किंमत आता तीन हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ओप्पोचा A9 2020 फोन आता 12990 रुपयांमध्ये मिळणार आहे. 

एका सूर्यग्रहणामुळे आइन्स्टाईन झाले जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ

मरीन ग्रे, ग्रॅडिअंट व्हाइट, व्हॅनिला मिंट आणि स्पेस पर्पल कलर ऑप्शनमध्ये मिळणाऱ्या या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरिअंटमध्ये कोणताही बदल झालेला नाही. अॅमेझॉन इंडियावर या फोनवर 500 रुपयांची सूट दिली जात आहे. 

Apple ची iPhone साठी नवी सिस्टिम, iOS 1 नंतर पहिल्यांदाच केला हा बदल

ओप्पो A9 2020 मध्ये 720x1600 पिक्सल रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा वॉटरड्रॉप सनलाइट डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन टू बॉडी रेशो 89 टक्के इतका आहे. फोन वापरताना युजरच्या डोळ्यांना त्रास होऊ नये सासाठी यामध्ये ब्लू लाइट फिल्टलरसाठी खास ब्लू शील्ड देण्यात आली आहे.

 गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान

A9 2020 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असलेल्या फोनमध्ये स्नॅप ड्रॅगन 665 प्रोसेसर आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येते. चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह एक 8 मेगापिक्सल आणि दोन 2 मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. सेल्फिसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय. 
 



from News Story Feeds https://ift.tt/2YuHPIn

Comments

clue frame