नवी दिल्ली - टेलिकम्युनिकेशन कंपन्या सातत्याने नवनवीन ऑफर्स ग्राहकांना देत असतात. रिलायन्सने आता त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन प्लॅन लाँच केले आहेत. जास्त डेटाची गरज असलेल्यांसाठी हे प्लॅन फायद्याचे आहेत. यामध्ये दरदिवशी 3 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय जिओ टू जिओ फ्री कॉलिंग, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी नॉन जिओ मिनिटे मिळतील.
चीनच्या ५२ ॲप्सपासून सावध राहा, वाचा पूर्ण यादी
जिओचा 28 दिवसांसाठी 349 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये दररोज 3 जीबी इंटरनेट मिळतं. जिओ टू जिओ फ्री कॉलिंग असून नॉन जिओसाठी 1 हजार मिनिटे मिळतील. याशिवाय दररोज 100 एसएमएसही करता येणरा आहेत. जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे.
कल्पना नव्हे वास्तव; हजार एचडी चित्रपट क्षणात डाऊनलोड
जिओने 28 दिवसांसाठी दोन प्लॅन दिले आहेत. त्यात 349 आणि 401 रुपयांचा एक असे प्लॅन आहेत. 401 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळतो. याशिवाय अतिरिक्त 6 जीबी डेटा दिला जातो. युजर्सना या प्लॅनमध्ये डिझनी हॉटस्टार VIP सबस्क्रिप्शन फ्रि मिळते. तसंच नॉन जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1 हजार मिनिटांचा टॉकटाईमही मिळणार आहे.
मेड इन चायना नसलेला मोबाइल शोधताय? पाहा टॉप 10 स्मार्टफोनची यादी
कंपनीने 84 दिवसांसाठीसुद्धा एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये दररोज तीन जीबी डेटा आणि अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग फ्री मिळतात. तसंच इतर नेवटवर्कवर कॉलिंगसाठी 3 हजार मिनिटांचा टॉकटाइम दिला आहे. 999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनही मिळतं.
from News Story Feeds https://ift.tt/3ei74mG
Comments
Post a Comment