कोविड-19 साठी तुमचा स्वॅब तुम्हीच घ्या...! 

कोविड-19 च्या लक्षणाची तपासणी करण्यासाठी स्वॅब घेतला जातो. यानंतर स्वॅबची तपासणी केली जाते. तपासणीमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह येऊ शकेल. डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी तुमचा स्वॅब घेतात; मात्र तुमचा स्वॅब घेताना आरोग्य कर्मचारी पूर्णपणे काळजी घेतो. तरीही धुकधुक, धडधड, भिती ही असते. अशावेळी तुमचा स्वॅब तुम्हीच काढून घ्या. तुम्ही सुरक्षित राहा. आरोग्य कर्मचारीही सुरक्षित राहतील, असे अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना असते तशी भिती स्वॅब देणाऱ्यांनाही असते. यासाठी तुम्ही घरी, ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये, निवांतपणे जिथे उभे आहात, तिथे तुमचा स्वॅब तुम्हीच काढू शकता. हे शक्‍य आहे, असे स्टॅनफोर्डचे संशोधक सांगतात. तर मग प्रयत्न करा. तुमचा स्वॅब तुम्हीच द्या; पण ही प्रक्रिया कशी असते ते पहिल्यांदा समजून घ्या. सुरवातीला जमणार नाही. हळूहळू जमेल. संशोधक म्हणतात, ही पद्धती अचूक अन्‌ सुरक्षित आहे. हा स्वॅब नाक आणि घशातून घेतला जातो. 

कोविड-19 चा प्रभाव हा जगभरात अजूनही आहे. हा प्रभाव कधी कमी होईल, हे आजघडीला तरी सांगता येणार नाही. म्हणून कोविड-19 पासून सुरक्षित राहण्यासाठी स्वत:च उपाययोजना केली पाहिजे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक म्हणतात, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि संरक्षणात्मक उपकरणांचा वापर मर्यादित न ठेवता कोविड-19 च्या अचूक चाचणीसाठी लोकांनी स्वत:चे अनुनासिक स्वॅब (नाकातून) कसे बाजूला काढावेत, हे शिकविण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरुन लोकांना स्वत:चे स्वॅब स्वत:च काढता येतील. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी यासाठी एका अभ्यास केला. जेव्हा तुम्ही स्वत:च्या अनुनासिकमधून स्वॅब काढल्यानंतर जितकी अचूकता येते. तितकी अचुकता ही आरोग्य कर्मचाऱ्यांच्यांनी गोळा केलेल्या स्वॅबच्या नमुन्या इतकी अचूकता येत नाही. म्हणजे, तुम्ही काढलेल्या स्वॅबची अचूकता ही कितीतरी पटीने महत्वाची असते. यासाठी 30 लोक या संशोधन प्रकल्पात सहभागी झाले होते. जे यापूर्वी कोविड-19 साठी त्यांनी चाचणी केली होती. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये 12 जून रोजी हा अभ्यास प्रकाशित झाला होता. 

कोविड-19 चा विषाणू आपल्या शरिरात आहे, असा संशय असलेल्या लोकांनी त्यांचे स्वत:चे नमुना गोळा करण्यास परवानगी देण्याचे बरेच फायदे आहेत. आता जगभरात अशा नमुना संग्रह किट मोठ्या प्रमाणात वितरित केल्या जाऊ शकतात. ज्यामुळे अधिक लोकांची चाचणी घेता येऊ शकेल. यासाठी लोकांना दूर अंतरावरुन जाऊन रुग्णालयात अथवा अन्यत्र ठिकाणी जिथे चाचणीसाठी जाता येते. अशा ठिकाणी प्रवास करावा लागणार नाही. आरोग्य सेवकांकडे जा. तिथे स्वॅब द्या, अशी यातायात करावी लागणार नाही. शिवाय कुठेही जाऊन कोविड-19 विषाणूंचे संक्रमण करण्याचा धोका ही नाही. तुमच्या संपर्कात लोक येणार नाहीत. जिथे असे सेंटर असते. तेथील लोकांच्या गर्दीतून ही संक्रमण होणार नाही. स्वॅवबसाठी लागणारी उपकरणे तुम्ही घरी ठेवा. ही उपकरणे तुम्ही स्वत: विकत घेऊ शकता. जेणेकरुन तुमच्या कुटुंबांना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना असे स्वॅब स्वत: काढा, असे सांगू शकता. संशय आला तरी स्वत:चा स्वॅब डॉक्‍टर किंवा प्रयोगशाळेत द्या. जेणेकरुन हा स्वॅब सुरक्षित राहील. तुम्ही ही सुरक्षित राहाल.

आरोग्य संशोधन प्रा. डॉ. व्होन्ने मालडोनाडो म्हणाले, कोविड-19 च्या विषाणूचा सर्वांगीण प्रसार कमी करण्यासाठी आपली चाचणी क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे. स्वॅबची नमुना संकलन प्रक्रिया तुम्ही स्वत:च्या कारमध्ये किंवा घरी, रूग्णालयात सुरक्षितपणे आणि सहजपणे केली जाऊ शकते. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तुमचा स्वॅब देण्याची गरज नाही. विशेष म्हणजे, अनेक लोकांना चाचणीसाठी नमुने सादर करण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते.'' डॉ. मालडोनाडो हे ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेडलिच फॅमिलीचे प्राध्यापक, आपत्कालीन वैद्यकीय संचालक, आपत्कालीन वैद्यकीय सहाय्यक प्रा. प्रशांती गोविंदराजन, ज्येष्ठ संशोधन आणि डाटा विश्‍लेषक जोनाथन अल्तामीरानो कार्यरत आहेत. 

अनुनासिक स्वॅबच्या सुचना 
अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तिंनी मार्चमध्ये स्टॅनफोर्ड हेल्थ केअर येथे कोविड-19 च्या विषाणूची चाचणी केली. प्रा. डॉ. मालडोनाडो आणि सहकाऱ्यांनी सहभागी असलेल्या प्रत्येकाशी घरी फोनवर संपर्क साधला. त्यांना अनुनासिकमधून (नाक) स्वॅब कसे गोळा करावेत, याबद्दल एक लेखी सूचना दिली. तसेच एक छोटा व्हिडिओ ही पाठविला. जेणेकरुन व्हिडिओ पाहून आपल्या नाकातील स्वॅब कसा गोळा करायचे, हे अचूक समजू शकेल. ड्राइव्ह-थ्रू चाचणीसाठी त्यांना स्टॅनफोर्ड हेल्थ केअरकडे परत जाण्यास सांगितले गेले. त्या भेटीत त्यांनी दोन्ही नाकपुड्यांना दोन्ही बाजूला थोडे दाबून स्वत: चे नमुने गोळा केले. त्यानंतर एका डॉक्‍टरने घशाच्या मागील बाजूस आणि टॉन्सिलवर अनुनासिक स्वॅब वापरुन दोन अतिरिक्त नमुने गोळा केले. स्टॅनफोर्ड क्‍लिनिकल विषाणू प्रयोगशाळेत तिन्ही नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. 

सहभागी पैकी 30 जणांना तीन नमुन्यांकरिता विषाणूबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक एकसारखे परिणाम मिळाले. यापैकी 11 जण सकारात्मक आणि 18 नकारात्मक होते. एका व्यक्तीने ड्राईव्ह-थ्रू साइटवर स्व-संग्रहित स्वॅबद्वारे शरिातील विषाणूची उपस्थिती उघडकीस आणली; तर डॉक्‍टरने संकलित केलेल्या दोन स्वॅबच्या नकारात्मक चाचणी केल्या. संशोधकांना हे देखील जाणून घेण्यात रस होता की, एखाद्या संसर्गग्रस्त व्यक्तीस प्रथम लक्षणे आढळल्यानंतर त्या विषाणूची तपासणी किती काळ करायची? 

23 सहभागींनी नोंदवले, की त्यांना प्रथम ड्राईव्ह-थ्रू टेस्टला परत येण्यापूर्वी चार ते 37 दिवसांपूर्वी लक्षणे आढळली. (यात सहभागी होणाऱ्या सातजणांकरिता लक्षण सुरू होण्याची वेळ मात्र नोंद झाली नाही). लक्षणे सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत परत आलेल्या 12 लोकांपैकी सात जणांची चाचणी सकारात्मक झाली; लक्षण सुरू झाल्यावर दोन आठवड्यांपेक्षा जास्त चाचणीसाठी परत आलेल्या 11 लोकांपैकी केवळ दोनच जणांची चाचणी सकारात्मक आहे. 

प्रा. डॉ. मालडोनॅडो म्हणाले, ""संक्रमित व्यक्ती किती काळ संसर्गजन्य राहू शकते आणि त्यांच्या घरात संक्रमणाची पद्धत काय असू शकते, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 मधील व्यक्ती किती काळ अलगीकरण ठेवली पाहिजे आणि कुटुंबातील सदस्यांसह किंवा सहकाऱ्यांशी पुन्हा संवाद साधणे सुरक्षित असेल, याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात मदत करेल. विषाणूच्या "शेडिंग'ची वेळ समजून घेणे विशेषत: पूर्वी संक्रमित आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक आहे. ज्यांना इतर कोविड-19 रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे.''
 

  



from News Story Feeds https://ift.tt/2BjGY3P

Comments

clue frame