गुगल प्ले स्टोअरवर गेल्या काही दिवसांपासून अनेक मालवेअऱ अॅप्स असल्याची माहिती सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी प्ले स्टोअरवर 38 मालवेअर अॅप असल्याचं आढळलं होतं. त्यानंतर आता आणखी 17 अॅप्सची माहिती देण्यात आली आहे. ट्रोजन फॅमिलीतील HiddenAds ची ही अॅप्स आहेत. सायबर सिक्युरीटी फर्म Avast ने याबाबत सांगितले आहे.
सर्व अॅप्स HiddenAds च्या एका मोठ्या मोहिमेचा भाग आहेत. सुरुवातील या अॅप्सनी भारतीय युजर्सना जाळ्यात अडकवलं होतं. त्यानंतर दक्षिण आशियातले युजर्स त्यांच्या निशाण्यावर होते. Avast च्या अहवालात सांगितंल आहे की, ही अॅप्स प्ले स्टोअरवर गेम अॅप म्हणून होती मात्र प्रत्यक्षात यातून घुसघोरी कऱणाऱ्या जाहिरातींसाठी डिझाइन केलं होतं.
टिकटॉक Uninstall केलं म्हणजे झालं नाही, तुम्ही ही प्रोसेस केलीत का?
अॅप्स लोकांना जाहिराती दाखवत होतं. त्याकाळात फोनमधील खाजगी माहितीची चोरी केली जात होती. अॅप्स ब्राउजरच्या माध्यमातून तुम्ही सर्च केलेल्या गोष्टींवर नजर ठेवली जात होती. या ट्रोजनचं वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा कोणतंही डिव्हाइस यामध्ये अडकतं तेव्हा त्यातून अॅपचा आयकॉन जातो. यामुळे लोकांनी कळतही नाही की त्यांच्याकडे अशी काही अॅप आहेत.
गुगलने delete केलेले हे apps तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर सावधान
Avast ने गुगलला अशा प्रकारच्या 47 अॅप्सची माहिती दिली होती. त्यातील 30 अॅप्स गुगलने हटवली होती मात्र इतर 17 अॅप्स प्ले स्टोअरवर होती. अॅव्हास्टने दावा केला की जेव्हा ही अॅप्स कोणीही डाऊनलोड करत होतं तेव्हा अॅपमध्ये टायमर सुरु होत असे. त्यानंतर युजरला त्या वेळेतच गेम खेळता येत असेय टायमर संपल्यानंतर फोनमधील अॅपचे आयकॉन नाहीसे होत असे. आयकॉन दिसेनासे झाल्यानंतर जाहिराती दाखवायला सुरुवात करत होते.
अॅप्समधील काही नावे - Skate Board - New, Find Hidden Differences, Spot Hidden Differences, Tony Shoot - NEW आणि Stacking Guys
from News Story Feeds https://ift.tt/3g4fpuF
Comments
Post a Comment