फक्त 17 मिनिटात मोबाइलची बॅटरी फुल्ल, 100W फास्ट चार्जरची कमाल

नवी दिल्ली - स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र यासोबत स्मार्टफोनच्या चार्जिंगची समस्याही मोठी आहे. अनेकदा अचानक बॅटरी संपते. त्यानंतर पुन्हा चार्जिंग करण्यात वेळ जातो. त्यामुळे सतत पॉवर बँकही सोबत ठेवावी लागते. आता हे टेन्शन कमी होणार आहे. केवळ 17 मिनिटात मोबाइलची पूर्ण बॅटरी चार्जिंग होणारी टेक्नॉलॉजी लवकरच बाजारात येणार आहे.

शाओमीने गेल्या वर्षी झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये त्यांच्या 100w सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या संकल्पनेची माहिती दिली होती. या टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे 4000mAh क्षमतेची पूर्ण डिस्चार्ज झालेली बॅटरी फुल चार्जिंग होण्यासाठी फक्त 17 मिनिटे लागतात. अद्याप कंपनी त्यांच्या या नव्या टेक्नॉलॉजीचं कमर्शिअल व्हर्जन लाँच केलेलं नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच 100W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बाजारात आणण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने हेसुद्धा स्पष्ट केलेलं नाही की ही टेक्नॉलॉजी कोणत्या फोनसाठी याचा वापर करणार.

हे वाचा - सावधान! प्ले स्टोअरवरील 17 अॅप्स डाऊनलोड केली असतील तर डिलिट करा

काही रिपोर्टसमध्ये केलेल्या दाव्यानुसार  Mi Mix 4 मध्ये  100W फास्चाट र्जिंगचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अद्याप या वापराबाबत कंपनीकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. चीनमधील प्रसिद्ध टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनच्या माहितीनुसार क्वालकॉमचा नवा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 875 येण्याची शक्यत आहे. या गेमिंग स्मार्टफोनमध्ये याचा वापर केला जाईल. याशिवाय शाओमीच्या 100W चार्जिंगसुद्धा गेमिंग स्मार्टफोनमध्ये बघायला मिळेल.

शाओमीचे म्हणणे आहे की 100 W सुपर चार्जिंग टर्बो टेक्नॉलॉजी ही 9 फोल्ड चार्ज प्रोटेक्शन आणि हाय व्होल्टेज चार्ज पंपसह मिळते. कंपनीच्या मते 9 फोल्ड प्रोटेक्शनमधील 7 मदरबोर्डसाठी तर 2 फोल्ड प्रोटेक्शन बॅटरीसाठी आहेत. 

BS-6 लागू झाल्यावरही 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील 'या' कार

सुपर फास्ट चार्जिंगच्या बाबतीत शाओमीला मोठी टक्कर मिळू शकते. विवोसुद्धा नव्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्याकडूनही फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. शाओमीच्या पुढे त्यांचे एक पाऊल असून त्यांनी विवो 120 w फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी केली असल्याचे समजते. विवोने गेल्या वर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीची संकल्पना मांडली होती. विवोची ही फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात आल्यास चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. पूर्ण डिस्चार्ज झालेली बॅटरी फुल होण्यासाठी फक्त 13 मिनिटे इतका वेळ लागेल.



from News Story Feeds https://ift.tt/31rINHe

Comments

clue frame