नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी लवकरच नोट २० स्मार्टफोन सीरिज आणत आहे. या सीरिजचे खास वैशिष्ट्ये म्हणजे गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोनची खूप आधीपासून चर्चा सुरू आहे. परंतु, आता ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. कॅमेरा लेन्स सोडून या फोनमधील बाकीचे फीचर्स नोट २० प्लस यासारखे असतील. वाचाः S20 सीरिज पुन्हा आणतेय कंपनी कंपनीने गॅलेक्सी एस २० सीरीजमध्ये कंपनीने असेच केले होते. कंपनीने गॅलेक्सी S20, S20+ आणि S20 Ultra स्मार्टफोन आणले होते. S20 Ultra चे फीचर्स सीरिजच्या बाकीच्या फोनसारखेच होते. परंतु, या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला होता. वाचाः असे असतील फीचर्स यात समोर आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट अल्ट्रा मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटची LTPO OLED डिस्प्ले असणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर दिला जाणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, फोनच्या रियर कॅमेऱ्यात ५० एक्स झूम सोबत पेरिस्कोप कॅमेरा असणार आहे. तसेच यात टेलिफोटो आणि अल्ट्रावाइड कॅमेरा सुद्धा मिळू शकतो. वाचाः कधी आहे लाँचिंग रिपोर्ट्च्या माहितीनुसार, सीरिजचे अन्य फोनसोबत सॅमसंग गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा ५ ऑगस्ट रोजी समोर येईल. याशिवाय, कंपनी गॅलेक्सी Z Flip चे ५ जी व्हेरियंट सुद्धा घेऊन येत आहे. तसेच खूप आधीपासून चर्चेत असलेला गॅलेक्सी फोल्ड २ स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यात लाँच करण्यात येईल. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dD3fHx
Comments
Post a Comment