नोकियाचा नवा स्मार्ट TV, जाणून घ्या किंमत

नवी दिल्लीः नोकियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नोकियाचा नवीन स्मार्ट टीव्ही येत आहे. नोकियाचा नवीन स्मार्ट टीव्ही ४३ इंचाचा आहे. हा टीव्ही ४ जून रोजी भारतात लाँच होणार आहे. नोकिया पॉवर युजर च्या रिपोर्टनुसार, ४३ इंचाचा नोकियाचा टीव्ही ४ जूनला लाँच होणार असून या टीव्हीची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. एका दुसऱ्या रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या टीव्हीची किंमत उघड केली आहे. नोकियाची वेबसाईट मार्च पासून ४३ इंचाच्या व्हेरियंटला टिज करीत आहे. करोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे या टीव्हीची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. वाचाः टीव्हीची किंमत किती? नोकियाचे प्रोडक्टस बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने गॅझेट्स ३६० ला कन्फर्म केले आहे की, ४३ इंचाचा टीव्ही भारतात ४ जून रोजी लाँच होणार आहे. या नवीन स्मार्ट टीव्हीची किंमत ३१ हजार ते ३४ हजार रुपयांदरम्यान असू शकेल. दरम्यान, या टीव्हीची किंमत आणि त्याच्या खरेदीवर ऑफर संदर्भातील घोषणा त्या टीव्हीची लाँचिंग दरम्यान करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत फ्लिपकार्टनेही नोकियाच्या नवीन टीव्हीचा टीझर पोस्ट केला होता. नोकियाच्या ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीचा सामना मार्केटमधील उपलब्ध असलेल्या रियलमी, शाओमी, मोटोरोला आणि Vu यासारख्या दुसऱ्या कंपन्याच्या टीव्हीसोबत होणार आहे. रियलमीने नुकताच आपला ४३ इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीची किंमत भारतात २१ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः टीव्हीची खास वैशिष्ट्ये नोकियाच्या ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीत JBL ऑडियो, इंटेलीजेंट डिमिंग, DTS TruSurround आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट करते. नोकियाचा हा नवा टीव्ही अँड्रॉयड ९.० ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच ५५ इंचाच्या व्हेरियंटसारखा व्ह्यूइंग एक्सपिरियन्स देईल. ४३ इंचाचा व्हेरियंटचे वैशिष्ट्ये हे ५५ इंचाच्या टीव्ही सारखे देण्यात आले आहेत. नोकियाचा नवीन टीव्ही गुगल असिस्टेंटचा व्हाईस कमांड इंटरफेस पॉवर्ड देण्यात आला आहे. नोकियाच्या ५५ इंचाच्या टीव्हीची किंमत ४१ हजार ९९९ रुपये आहे. हा टीव्ही अँड्रॉयड 9 Pie वर चालतो. यात 4K स्मार्ट टीव्हीत क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. नोकियाचा ५५ इंचाच्या टीव्हीत 2.25GB रॅम आणि 16GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. टीव्हीत डॉल्बी ऑडियो आणि DTS ट्रूसाउंड सोबत 12W चे २ स्पीकर्स देण्यात आले आहेत. नोकियाच्या या दोन नवीन मॉडलमध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट आणि अॅडवॉन्स डेटा सेविंग फंक्शन दिले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U2QgYT

Comments

clue frame