नवी दिल्लीः सॅमसंगने आपल्या ए सीरिज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन आणि Galaxy A31 या स्मार्टफोनला ग्लोबल बाजारात लाँच केले होते. आता कंपनीने हे दोन्ही फोन वेगवेगळ्या देशात लाँच करायला सुरुवात केली आहे. या यादीत सर्वात आधी सॅमसंगने हे दोन्ही फोन थायलँडमध्ये लाँच केले आहेत. ३ जीबी रॅमच्या गॅलेक्सी ए११ ची किंमत १२ हजार ३०० रुपये तर ६ जीबी रॅम गॅलेक्सी ए३१ ची किंमत २१ हजार ३०० रुपये आहे. दोन्ही फोनला ब्लू रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः Samsung Galaxy A11 ची वैशिष्ट्ये सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा ७२०x१५६० एलसीडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. हँडसेट २ जीबी, ३ जीबी रॅमसोबत ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. कंपनीने केवळ ३ जीबी रॅम स्मार्टफोनला थायलँडला लाँच केले आहे. गॅलेक्सी ए११ मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फोनमध्ये पुढच्या बाजुला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. वाचाः ची वैशिष्ट्ये गॅलेक्सी ए३१ स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोनमध्ये २ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. हँडसेटमध्ये ४८ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे चार कॅमेरे दिले आहेत. फ्रंटला फोनमद्ये २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून याला १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dO2BHC
Comments
Post a Comment