Reliance Jio, Airtel, Vodafone: फेक कॉल-SMS असे ब्लॉक करा

नवी दिल्लीः मोबाइल युजर्संना नेहमीच टेलिमार्केटिंग आणि स्पॅम कॉल्समुळे त्रास सहन करावा लागत असतो. अनेकदा महत्त्वाची मीटिंग सुरू असताना कॉल, एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना अचानकपणे मोबाइलची रिंग वाजते किंवा एसएमएस येत असतात. अननाऊन पण महत्त्वाचा कॉल असू शकतो असे समजून अनेकदा कॉल उचलला जातो. परंतु, नंतर कळते की, हा फेक मेसेज होता. या सर्वांपासून सुटका मिळवण्यासाठी काही खास टिप्स आहेत. रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या डू नॉट डिस्टर्ब सर्विसची (DND) माहिती अनेकांना नसते. या DND सेवेअंतर्गत फेक आणि त्रास पोहोचवणारे कॉल्स आणि एसएमएस पासून सुटका करता येऊ शकते. कसे ते पाहा.... वाचाः रिलायन्स जिओ नंबर्स असलेल्या ग्राहकांसाठी >> सर्वात आधी आपल्या फोनमध्ये माय जिओ अॅप लाँच करा >> त्यानंतर अॅपला लॉग-इन करा >> आता डाव्या बाजुला कॉर्नरमध्ये दिलेल्या आयकॉनवर टॅप करा >> सेटिंग्सला चेक करा >> या ठिकाणी दिलेल्या डीएनडी DND पर्यायाला सिलेक्ट करा >> त्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक मेसेज येईल. मेसेज मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत तुमचा जिओ नंबर DND सर्विस अंतर्गत अॅक्टिव होईल. एअरटेल युजर्संसाठी DND सेवा >> सर्वात आधी कंपनीच्या वेबसाईटवर जा. आणि DND पेज चेक करा. >> आता एअरटेल मोबाइल सर्विस बटनावर क्लिक करा >> स्क्रीनवर आलेल्या पॉप-अप बॉक्सवर आपला मोबाइल नंबर टाका >> त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाका >> त्यानंतर stop all options वर टॅप करा >> आता तुमच्या नंबरवर DND सर्विस अॅक्टिव होईल. व्होडाफोन-आयडिया DND सेवा अशी अॅक्टिव करा >> सर्वात आधी व्होडाफोन-आयडियाच्या वेबसाइटवरील देलेल्या DND पेजवर जा. >> या ठिकाणी नाव, ईमेल आयडी आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाका >> त्यानंतर फुल डीएनडी पर्यायासाठी येस वर क्लिक करा >> यानंतर तुमच्या नंबरवर एक कोड येईल >> या कोडला एन्टर केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा >> हे सर्व केल्यानंतर आता स्पॅम कॉल आणि गरज नसलेले मेसेज येणे बंद होईल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fVHnta

Comments

clue frame