Oppo A31 स्मार्टफोन भारतात लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपला ए३१ भारतात लाँच केला आहे. ओप्पोने २०२० च्या ४ जीबी रॅमला भारतात २७ फेब्रुवारी २०२० रोजी लाँच केले होते. आता कंपनीने ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनी या स्मार्टफोनला मार्च महिन्यात लाँच करणार होती. परंतु, करोना व्हायरसमुळे याची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. वाचाः Oppo A31 (2020) ची लेटेस्ट किंमत ए३१ च्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे. या स्मार्टफोनला कंपनीने आपल्या अधिकृत साइटसोबतच अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येवू शकणार आहे. या स्मार्टफोनची विक्री केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोन क्षेत्रात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. Oppo A31 (2020) ची वैशिष्ट्ये ओप्पोने या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत मीडियाटेक हीलियो पी ३५ एसओसीचा सपोर्ट दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ९वर आधारीत ६.१.२ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Oppo A31 (2020) चा कॅमेरा युजर्संना या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळणार आहे. ज्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २-२ मेगापिक्सलचे अन्य सेन्सर मिळणार आहे. या फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A31 (2020) ची बॅटरी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ४जी व्हीओएलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे फीचर्स दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ४२३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LtuNmW

Comments

clue frame