nokia 125 आणि nokia 150 फीचर फोन लाँच

नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबलने स्मार्टफोनच्या ट्रेंडमध्ये दोन नवीन लाँच केले आहेत. आणि अशी या दोन स्मार्टफोनची नावे आहेत. युजर्संना या दोन्ही फीचर फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, फ्लॅश लाइट आणि १ एमबी रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने याआधीही अनेक फीचर फोन ग्लोबल बाजारात लाँच केलेल आहेत. लोकांनी या फोनला चांगला प्रतिसाद दिला आहे. वाचाः नोकिया फोनची किंमत एचएमडी ग्लोबलने आतापर्यंत नोकिया १२५ आणि नोकिया १५० फीचर फोनच्या किंमतीची घोषणा केली नाही. परंतु, या दोन्ही फोनच्या किंमती बजेटमधील असतील असा अंदाज आहे. नोकिया १२५ ची वैशिष्ट्ये नोकिया १२५ मध्ये २.४ इंचाचा क्यूव्हीजीए कलरचा डिस्प्ले आहे. यात टायपिंग आणि मोठ्या साईजचे बटन देण्यात आले आहे. युजर्संना या फोनमध्ये ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. तसेच या फोनमध्ये वायरलेस रेडिओसह एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. या फोनमध्ये १०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनची बॅटरी १९.४ तास बॅकअप देत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. फोनमध्ये ड्युअल स्लॉट सपोर्ट दिला आहे. वाचाः नोकिया १५० ची वैशिष्ट्ये नोकिया १५० फीचर फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. या फीचर फोनमध्ये नोकिया १२५ प्रमाणे की-पॅड दिला आहे. फोनमध्ये ४ एमबी रॅम सोबत ४ एमबी स्टोरेज दिला आहे. हा फीचर फोन ३० प्लस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. कंपनीने या फोनमध्ये १०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. युजर्संना या फोनमध्ये एमपी ३ प्लेअर आणि वायरलेस रेडियो चा सपोर्ट मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये व्हीजीए कॅमेरा सुद्धा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cw8zwz

Comments

clue frame