नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी ऑनरने १२ मे रोजी भारतात नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनची अनेकांना फार उत्सूकता होती. अवघ्या ३ सेकंदात या फोनचा स्टॉक संपला यावरून या फोनला कसा प्रतिसाद मिळाला आहे, याचा अंदाज बांधता येतो. कंपनीने या फोनचा सेल ऑनलाइन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर आयोजित केला होता. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात , पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच 4,000mAh बॅटरी यासारखे जबरदस्त फीचर दिले आहेत. वाचाः दुपारी १२ वाजता पार पडला सेल २१ मे रोजी फ्लिपकार्टवर कंपनीने स्पेशल अर्ली अॅक्सेस सेल (Special Early Access Sale) आयोजित केला होता. हा सेल दुपारी १२ वाजता सुरू झाला होता. कंपनीने सांगितले की, या सेलमध्ये 9X Pro ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला व अवघ्या ३ सेकंदात सर्व फोनची विक्री झाली, असे कंपनीने म्हटले आहे. हा सेल दोन दिवसांपर्यंत चालवण्याची कंपनीची योजना होती, असेही ऑनरने सांगितले. HONOR 9X Pro ची किंमत भारतात या स्मार्टफोनला १७ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. परंतु, सेलमध्ये रजिस्टर करणाऱ्या युजर्संना कंपनीने ३ हजार रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केला होता. त्यानंतर हा फोन १४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्यात आला. कंपनीचा हा पहिला स्मार्टफोन आहे. जो ऑनरच्या AppGallery सोबत येतो. गुगल प्ले स्टोरच्या जागी काम करणारा ऑनरचा हा स्वतःचा अॅप आहे. वाचाः HONOR 9X Pro ची खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये 7nm किरिन 810 चिपसेट दिला आहे. जो एक पॉवरफुल प्रोसेसर आहे. यात ६ जीबी रॅम आणि २५६ चा इंटरनल स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ६.५९ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा सेन्सर शिवाय, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 4,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gchDsO
Comments
Post a Comment