Goqii Vital 3.0 स्मार्टबँड भारतात लाँच, शरीराचे तापमान सांगणार

नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरस पसरल्यानंतर आरोग्य क्षेत्रात संबंधित गॅझेट्सची मागणी वाढली आहे. कालपर्यंत बाजारात ज्या इन्फारेड थर्मामिटरची कोणतीही मागणी नव्हती त्याच थर्मामिटरची मागणी आता अचानक वाढली आहे. त्यावरून अंदाज बांधता येवू शकतो. ही गरज लक्षात घेऊन मोबाइल कंपन्या सुद्धा आता इंफ्रारेड थर्मामीटर बाजारात लाँच करू लागल्या आहेत. वाचाः गोकिलने भारतीय बाजारात आपला नवीन फिटनेस Goqii Vital 3.0 लाँच केला आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे बँड शरीराचे तापमान सांगते. करोना व्हायरसच्या लक्षणामध्ये सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे शरीरात ताप येणे किंवा अंग गरम होणे होय. हे स्मार्टबँड ब्लड प्रेशर, हर्ट रेट आणि झोपायचे कसे यासंबंधीची माहिती देणार आहे. गोकिलने यासाठी जर्मनीच्या एका हेल्थ टेक कंपनीने Thryve सोबत करार केला आहे. कंपनीने सांगितले की, सध्या याची चाचणी सुरू आहे. पुढील सहा महिन्यात हे येईल. वाचाः Goqii Vital 3.0 भारतात या बँडची किंमत ३,९९९ रुपये आहे. सध्या Goqii इंडियाच्या वेबसाईटवरून याची बुकिंग होत आहे. लवकरच याची विक्री अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून होणार आहे. कंपनीने सांगितले हे लवकर बाजारात आणायचा प्रयत्न आहे. कारण, करोना वॉरियर्सला याची मदत होऊ शकते. Goqii Vital 3.0 स्मार्टबँडचे खास वैशिष्ट्ये यात करल डिस्प्ले वॉटरप्रूफ देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, एकावेळी चार्ज केल्यानंतर हे एक आठवडाभर चालू शकते. बँडवर युजर्संना मोबाइलवर आलेले मेसेज, कॉल, अन्य नोटिफिकेशन सुद्धा मिळणार आहे. या बँडला गोकिलच्या अॅपवरून कंट्रोल करता येऊ शकणार आहे. या बँडमध्ये अनेक अॅक्टिविटीज रेकॉर्ड करता येवू शकते. यात थर्मल लेंसर ७७ डिग्री ते ११३ डिग्री पर्यंत तापमान मोजता येऊ शकते. यात +/- 0.3 डिग्रीचा फॉरेनहाईट असल्याचा दावा आहे. फक्त स्कीन टच करताच शरीराचे तापमान कळणार गोक्वीचा दावा आहे की, फिटनेस ब्रँड ब्लड प्रेशर, ब्लड ग्लूकोज आणि एचबीए१ ला तपासण्याचे काम करू शकते. हे फिटनेस लवकरच अॅपलच्या वॉच प्रमाणे ईसीजी ला डिटेक्ट करण्यात सक्षम आहे. ईसीजी साठी काही पर्यायसाठी काही अपडेट्स येतील. Goqii Vital 3.0 केवळ स्कीन टचवरून बॉडी टेम्प्रेचरची नोंद करण्यात सक्षम आहे. अवघ्या एका मिनिटात हे शरीराचे तापमान सांगणार आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZeGB4R

Comments

clue frame