नवी दिल्लीः रिलायन्स जिओने नुकताच २३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या प्लानची वैधता मोठी आहे. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन आणि डेटा यासारखे जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्ही एकदा रिचार्ज केला तर तुम्हाला पुन्हा-पुन्हा रिचार्ज करायची गरज उरणार नाही. जिओकडे २३९९ रुपयां शिवाय ४९९९ रुपये आणि २१२१ रुपयांचा लाँग टर्म प्लान आहेत. जाणून घ्या या प्लानची सविस्तर माहिती.... वाचाः २३९९ रुपयांचा जिओ प्लान रिलायन्स जिओचा हा सर्वात नवीन प्लान आहे. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. म्हणजेच एका वर्षापर्यंत रिचार्जची सुट्टी. जिओच्या या प्लानमध्ये २ जीबी डेटा दरदिवशी मिळतो. म्हणजेच युजर्संना या प्लानमध्ये कंपनी एकूण ७३० जीबी डेटा ऑफर करते. तसेच ग्राहकांना जिओ ते जिओ अनलिमिटेड व दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट मिळतात. जिओ युजर्संना दररोज १०० एसएमएस फ्री पाठवण्याची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः २१२१ रुपयांचा जिओ प्लान जिओच्या या प्लानची किंमत २१२१ रुपये आहे. याची वैधता ३३६ दिवस आहे. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण १.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५०४ जीबी डेटा मिळतो. दरदिवशी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ६४ केबीपीएस होते. जिओ ते जिओवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट मिळते. तसेच १०० फ्री एसएमएसची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. ४९९९ रुपयांचा जिओ प्लान जिओच्या या प्लानची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. या प्लानची वैधता ३६० दिवस आहे. ग्राहकांना या पॅकमध्ये एकूण ३५० जीबी हायस्पीड डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. दर दिवशी मिळणाऱ्या फ्री एसएमएसची संख्या १०० आहे. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जाते. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १२००० मिनिट मिळतात. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zwohJR
Comments
Post a Comment