देशभरात BSNLची WiFi इंटरनेट सेवा, वाराणासीतून सुरुवात होणार

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी (BSNL) देशभरातील खेडे आणि शहरात वायफाय सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे. एका मर्यादेपर्यंत बीएसएनएल वायफाय सेवा () चा वापर फ्री केला जाऊ शकणार आहे. ज्या परिसरात वायफाय नेटवर्क लावले जाणार आहे. त्याला वायफाय हॉटस्पॉट (Wi-Fi Hotspot) असे संबोधले जाईल. बीएसएनएलच्या या हॉटस्पॉटची सुरुवात वाराणासी येथून सुरू होणार आहे. वाचाः BSNL WiFi चा वापर करण्यासाठी हे करा बीएसएनएलच्या हाय स्पीड इंटरनेटचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनमधील वायफाय ऑन करावे लागेल. त्यानंतर BSNL WiFi नेटवर्कला कनेक्ट करावे लागेल. त्यानंतर दहा अंकी मोबाइल नंबर टाकून पिन नंबरवर टॅप करावे लागेल. तुम्हाला एसएमएस मिळाल्यानंतर ६ अंकी पिन नंबर मिळेल. तो मोबाइलमध्ये टाकल्यानंतर बीएसएनएलचे वायफाय कनेक्शन मिळेल. वाचाः BSNL WiFi चे कुपन १० रुपयांपासून सुरू टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएल वायफाय कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला केवळ ३० मिनिटे फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त वेळ कनेक्ट हवे असेल तर कंपनीकडून तुम्हाला कुपन खरेदी करावे लागेल. ग्रामीण भागात तीन प्रकारचे कुपन उपलब्ध होतील. याची किंमत २५ रुपये, ४५ रुपये आणि १५० रुपये असेल. २५ रुपयांच्या बीएसएनएलच्या ग्रामीण भागातील वायफाय मध्ये ग्राहकांना ७ दिवसांची वैधतासह २ जीबी डेटा फ्रीमध्ये मिळेल. तर १५० रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची राहणार असून ग्राहकांना २८ जीबी डेटा मिळणार आहे. तर शहरी भागात १७ प्लान उपलब्ध असणार आहेत. याची सुरुवात १० रुपयांपासून सुरू होऊन ती १९९९ रुपयांपर्यंत असणार आहे. १९९९ रुपयांचा प्लान सर्वात महागडा असून यात २८ दिवसांची वैधता असून ग्राहकांना १६० जीबी डेटा मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Z0bCZX

Comments

clue frame