नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे देशभरात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्संसाठी नवीन-नवीन प्लान आणत आहेत. ज्यात ग्राहकांना चांगली इंटरनेटची सुविधा मिळायला हवी यासाठी टेलिकॉम कंपनी ऑफर्स सुद्धा देत आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी कंपनी लागोपाठ आपल्या युजर्संसाठी नवीन ऑफर्स आणतेय. आता बीएसएनएलने १४९८ रुपयांचा एक नवीन स्पेशल टॅरिफ व्हाऊचर आणला आहे. या प्लानमध्ये ९१ जीबी हाय स्पीड डेटा कोणत्याही FUP लिमिटमध्ये मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही या डेटाचा वापर एका दिवसात करा किंवा तुम्हाला गरज लागेल तितका करा. प्लानची वैधता संपेपर्यंत सुद्धा या डेटाचा वापर करता येऊ शकतो. वाचाः नवीन टॅरिफ व्हाऊचरमध्ये ये बेनिफिट्स हा बीएसएनएलचा लाँगक टर्म व्हाऊचर आहे. याची वैधता ३६५ दिवसांची आहे. या व्हाऊचरमध्ये ९१ जीबी डेटा मिळतो. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे तो खर्च करु शकतो. एका दिवसात तो खर्च करु शकता किंवा ३६५ दिवस दिवस तो खर्च करु शकता. BSNL चे अन्य टॅरिफ व्हाऊचर जर तुम्हाला १४९८ रुपयांचा प्लान आवडला नाही तर कंपनीकडे आणखी अनेक टॅरिफ व्हाऊचर्स आहेत. कंपनी ९६ रुपयांच्या प्लानमध्ये ११ जीबी डेटा देते. हा डेटा कोणत्याही एफयूपी शिवाय येतो. याची वैधता ३० दिवसांची आहे. तसेच ४८ रुपयांचा डेटा प्लान सुद्धा चांगला आहे. यात ३० दिवसांसाठी ५ जीबी डेटा मिळतो. वाचाः ९८ रुपयांत दररोज २ जीबी डेटा बीएसएनएलच्या ९८ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २० दिवसांची आहे. तसेच याशिवाय १९८ रुपयांच्या प्लानमध्ये इरोस नाऊ चे सब्सक्रिप्शन मिळते. तसेच २ जीबी डेटा तुम्हाला दररोज मिळतो. २ रुपयांचा वैधता प्लान भारत संचार निगम लिमिटेडने आपला वैधता एक्सटेन्शन प्लान रिवाईज केला आहे. सध्याची वैधता वाढवण्यासाठी कस्टमरच्या ग्रेस पिरियडच्या अखेरच्या दिवशी १९ रुपये कापून वैधता वाढवता येते. आता बीएसएनएलकडून या प्लानमध्ये बदल केले आहेत. कस्टमर वैधता संपल्यानंतर बीएसएनएल आता केवळ २ रुपयांत ३ दिवसांची वैधता देणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3grKOIu
Comments
Post a Comment