BSNLचा जबरदस्त प्लान, रोज मिळणार १.८ GB डेटा

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने आपला नवीन कॉम्बो १८ प्लान आणखी एका सर्कलमधील ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. BSNLचा हा रिचार्ज प्लान १८ रुपयांचा आहे. आता हा प्लान तामिळनाडू सर्कलमध्ये लागू केला आहे. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लान २२ सर्कलमध्ये मिळत आहे. कॉम्बो १८ प्लान, बीएसएनएलच्या स्वस्त प्लानपैकी एक आहे. BSNLच्या या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. कंपनीच्या कॉम्बो १८ प्लानमध्ये युजर्संना नंबरसोबत दुसऱ्या नंबरवर सुद्धा फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. BSNLचा हा प्लान आंध्र प्रदेश, तेलंगानासोबत आसाम, मणिपूर आणि नागालँडमध्ये उपलब्ध नाही. वाचाः प्लानमध्ये २५० मिनिटची फ्री कॉलिंग BSNLच्या या प्लानमध्ये दररोज १.८ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. दिवसभर डेटा लिमिट संपल्यानंतर याची स्पीड ८० केबीपीएस पर्यंत जाते. या प्लानमध्ये २५० मिनिट फ्री कॉलिंगची सुविधा दिली जाते. BSNL चा प्लान सध्या छत्तीसगड, चंदीगड, चेन्नई, दिव आणि दमण, दादरा आणि नगर हवेली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळसह अनेक सर्कलमध्ये उपलब्ध आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, पूर्वी आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्येही सुद्धा हा प्लान उपलब्ध आहे. BSNL ने ९८ रुपयांचा प्लान बदलला बीएसएनएलने आपला ९८ रुपयांचा डेटा व्हाऊचरमध्ये बदल केला आहे. सरकारी कंपनीच्या या डेटा व्हाऊचरची वैधता आता २२ दिवस करण्यात आली आहे. आधी ९८ रुपयांच्या या व्हाऊचरमध्ये २४ दिवसांची वैधता मिळत होती. प्लानमध्ये युजर्सला २ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. BSNLच्या या पॅकला डेटा त्सुनामी नाव दिले आहे. तसेच या प्लानमध्ये इरोस नाऊ इंटरटेनमेंट कॉप्म्पलीमेट्री अॅक्सेस मिळतो. वाचाः बीएसएनएलने आपल्या ६ पैसे कॅशबॅक ऑफरची वैधता ३१ मे पर्यंत वाढवली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना ६ पैसे कॅशबॅक मिळत आहे. पाच मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त लँडलाइन कॉल केल्यानंतर ही ऑफर मिळत आहे. ६ पैसे कॅशबॅक ऑफर अॅक्टिवेट करण्यासाठी युजर्संना 'ACT 6 paisa' लिहून 9478053334 वर पाठवावे लागेल. कंपनीची ही ऑफर वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होम सब्सक्रायबर्स युजर्संसाठी आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zXfNeQ

Comments

clue frame