१२९ ₹ प्लान बनला जिओचा सर्वात स्वस्त प्लान, कारण जाणून घ्या

नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा १२९ रुपयांचा प्रीपेड प्लान आता कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बनला आहे. कारण, जिओने ९८ रुपयांचा प्लान बंद केला आहे. त्यानंतर आता ग्राहकांना आपली सुविधा सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी १२९ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. जिओचा हा प्लान ९८ रुपयांच्या जुन्या प्लानपेक्षा ३१ रुपयांनी महाग आहे. वाचाः रिलायन्स जिओचा १२९ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा १२९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. ग्राहकांना एकूण २ जीबी डेटा मिळतो. तसेच ३०० SMS आणि जिओच्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन फ्री मिळते. ९८ रुपयांचा प्लान कसा होता कंपनीने ९८ रुपयांचा प्लान जिओ वेबसाईट आणि अॅप या दोन्हीवरून हटवला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओ वर फ्री कॉलिंग, २ जीबी डेटा आणि ३०० SMS मिळत होते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज लागत होता. या प्लानची वैधता २८ दिवसांची होती. या प्लानला बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओचा स्वस्त प्रीपेड प्लान १२९ रुपयांचा प्लान बनला आहे. वाचाः एअरटेल आणि व्होडाफोनचा ९८ रुपयांचा प्लान एअरटेल आणि व्होडाफोनने नुकताच आपला ९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या प्लानमध्ये आता १२ जीबी डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची कॉलिंग किंवा SMS ची सुविधा मिळत नाही. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bX4396

Comments

clue frame