नोकियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व कंपन्यांना टाकले मागे

नवी दिल्लीः फिनलँडची टेक कंपनी नोकियाने एका नवीन वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा केली आहे. नोकियाला स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्क मिळाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लास मध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाली आहे. त्यामुळे मागील सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. नोकियाने सांगितले की, कंपनीकडून कमर्शल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G सॉफ्टवेअर स्पीडची चाचणी करण्यात येत होती. आणि आता ही स्पीड ४.७ Gbps पर्यंत पोहोचली आहे. वाचाः कंपनीकडून 800MHz कमर्शल मिलीमीटर वेव 5G स्पेक्ट्रम आणि ड्यूल कनेक्टिविटी (EN-DC)फंक्शनॅलिटीच्या मदतीने या स्पीडची चाचणी करण्यात आली. EN-DC च्या मदतीने डिव्हाईस लागोपाठ 5G आणि LTE नेटवर्क्सने कनेक्ट होऊ शकणार आहे. याच्या मदतीने दोन्ही एयर इंटरफेस टेक्नोलॉजीवर डेटा ट्रान्समिट आणि रिसिव्ह केला जावू शकतो. याचाच अर्थ डिव्हाईस 5G किंवा LTE ने कनेक्ट होऊन आणखी चांगली सेवा युजर्संना देली जाऊ शकते. हुवेईकडे होता वर्ल्ड रेकॉर्ड गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हुवेईने 5G स्पीडचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचा दावा केला होता. हुवेईला स्पीड टेस्टवेळी २.९६ Gbps ची स्पीड मिळाली होती. अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून ५जी स्पीड टेस्ट करण्यात आली. परंतु, नोकियाची टॉप स्पीड बाकीच्या कंपन्यांपेक्षा किती तरी पट अधिक आहे. नोकियाचा एअरस्केल रेडिओ अॅक्सेस इंडस्ट्री लिडिंग आणि कमर्शल अँड-टू-अँड ५जी सॉल्यूशन आहे. ज्यात ऑपरेटर्स ग्लोबली ५जी स्पेक्ट्रम असेट्सचा वापर करता येणार आहे, असे नोकियाने म्हटले आहे. वाचाः ४ जीपेक्षा १० पट अधिक वेगवान नवीन रेकॉर्डवरून एक स्पष्ट झाले आहे की, 5G च्या मदतीने टॉप स्पीड आतापर्यंत डिव्हाईसेसमधून मिळालेली नाही. याची क्षमता अधिक आहे. लवकरच बाकी देशात ५ जी स्पेक्ट्रम आणि या संदर्भातील हार्डवेअरमध्ये सुधारणा करून युजर्संना जबरदस्त अनुभव मिळू शकतो. रिपोर्ट्समध्ये म्हटले की, ५ जी नेटवर्क आधीच्या ४ जी नेटवर्कच्या तुलनेत १० पट अधिक फास्ट असू शकते. या प्रमाणे ५जी कनेक्शनच्या मदतीने युजर्संना 10Gbps पर्यंत टॉप स्पीड दिली जाऊ शकते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TrZqgW

Comments

clue frame