नवी दिल्लीः एअरटेलने आपल्या ब्रॉडबँड युजर्संसाठी नवीन वर्क फ्रॉम होम प्लान्स आणले आहेत. कंपनीने या प्लानला असे नाव दिले आहे. कंपनीने हे प्लान्स लॉकडाऊनमध्ये जे लोक घरून काम करीत आहेत. त्यांच्यासाठी हे आणले आहेत. कंपनीने सांगितले की, गुगल मीट (Google Meet), झूम (Zoom) यासारखे व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग अॅपचा जे जास्त वापर करतात त्या युजर्संसाठी हे प्लान खास बनवण्यात आले आहेत. एअरटेल कॉर्पोरेट ब्रॉडबँड प्लानः या प्लानची किंमत ७९९ रुपये आहे. या प्लानमध्ये युजर्सला 1Gbps च्या स्पीडने डेटा मिळतो. तसेच याशिवाय या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग करण्याची सुविधा आहे. एअरटेलचा ३९९ रुपयांचा अनलिमिटेड व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग प्लान या प्लानमध्ये युजर्सला एअरटेल प्रायरिटी ४ जी डेटा सिम सोबत फ्रीमध्ये G-Suite अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग मिळते. या प्लानची सुरुवातीची किंमत ३९९ रुपये आहे. 50GB प्रॉयरिटी 4G डेटा प्लान या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. प्लानमध्ये 50GB प्रॉयरिटी 4G डेटा प्लान दर महिन्याला मिळतो. तसेच कॉम्प्लिमेंट्रीमध्ये G Suite लायसन्स मिळते. या प्लानसाठी २ हजार रुपयांची वन टाईम डिव्हाईस पेमेंट ठेवावी लागते. एयरटेल वर्क@होम अॅड ऑन प्लान्स या प्लानमध्ये युजरला प्रॉयरिटी 4G अॅक्सेस सोबत कॉर्पोरेट पोस्टपेड सिमसोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ५० जीबी डेटा मिळतो. कंपनीचा हा पोस्टपेड प्लान आहे. अनलिमिटेड व्डिडिओ कॉन्फ्रेंसिंग एअरटेल आपल्या कॉलेबरेशन सर्विससोबत व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग आणि मेसेजिंग सॉल्यूशन उपलब्ध करतो. ज्यात तुम्हाला गुगल मीट, सिस्को वेबेक्स आणि झूमचे अॅक्सेस मिळते. गुगल मीटचे अॅक्सेस ३० सप्टेंबर पर्यंत वैध आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2TrWXTI
Comments
Post a Comment