भारतीय कंपनीने जिंकले १ लाख डॉलरचे चॅलेंज

नवी दिल्लीः भारतीय टेक कंपनी गपशपने एक लाख जिंकले आहे. या आव्हानानंतर आता कंपनी भारतात फीचर फोन युजर्ससाठी पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करणार आहे. या पेमेंट प्लेटफॉर्मवरून जवळपास ५० लाख युजर्सला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. फीचर फोन सहजपणे एसएमएस, क्यूआर कोड आणि यूपीआय वरून ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहे. वाचाः भारतीय टेक कंपनी गपशपचा व्यापार भारतासह अमेरिका आणि युकेमध्ये सुरू आहे. हे चॅलेंज जिंकल्यानंतर गपशपला एनपीसीआय आणि CIIE.CO चा सपोर्ट मिळणार आहे. तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले की, नवीन तंत्रज्ञानाचा फीचर फोन युजर्सला मोठा फायदा झाला आहे. तसेच देशात डिजिटल पेमेंट करण्यासाठी नवीन पद्धत आली आहे. सीआयआयईचे सीओओ प्रियांका चोपडा यांनी सांगितले की, आजच्या घडीला ऑनलाइन पेमेंट यासारखी सुविधा युजर्संसाठी गरजेची आहे. तसेच हे सर्व पाहून आनंद होतोय की, आता कंपन्यांना युजर्सची सामान्य समस्या संपवण्यासाठी लागोपाठ काम करीत आहेत. वाचाः मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार, भारतात सध्या ४० वरून ४५ टक्के फीचर फोन युजर्स आहेत. ज्यांच्याकडे १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे फीचर्स फोन आहेत. तसेच गेल्या वर्षभरात फीचर फोनच्या युजर्संच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bvhihn

Comments

clue frame