नवी दिल्लीः फेसबुककडून आणखी एक सेफ्टी फीचर भारतात लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्संना आपले प्रोफाईल लॉक करता येऊ शकणार आहे. असे केल्यानंतर शेअर केलेले फोटो किंवा पोस्ट्स केवळ त्यांचे मित्रच पाहू शकतील. बाकी युजर्संना त्यांचे प्रोफाईल दिसेल पण कोणतीही पोस्ट दिसणार नाही. जे लोक जास्त माहिती सोशल मीडियावर शेअर करू इच्छित नाही किंवा आपली पोस्ट केवळ आपल्या मित्रांनाच दिसावी, असे ज्या युजर्संना वाटतेय, त्यांच्यासाठी हे फीचर खास असू शकणार आहे. वाचाः सोशल मीडिया नेटवर्कवर सर्व इंडियन युजर्सला हे फीचर पुढील आठवड्यापासून मिळणे सुरू होईल. फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर रोक्सेना ईराणी यांनी या फीचर संबंधी माहिती देताना सांगितले की, हे फीचर प्रोफाईल पिक्चर गार्डचे यशस्वी ठरल्यानंतर तसेच युजर्संकडून फिडबॅक मिळाल्यानंतर हे आणले जाणार आहे. ईराणी यांनी सांगितले, आम्ही सर्वात आधी प्रोफाईल सोबत सुरुवात केली आहे. कारण, बऱ्याच महिला युजर्संना भीती वाटत होती की त्यांचे फोटो डाऊनलोड किंवा शेअर केले जावू शकते. त्यामुळेच फेसबुकने सर्वात आधी प्रोफाईल पिक्चर गार्ड फीचर आणले आहे. वाचाः लॉक करता येईल प्रोफाईल फेसबुकने सांगितले की, या नवीन फीचरमुळे युजर्सच्या आपल्या प्रोफाईल फोटोशिवाय त्यांच्या बाकीच्या पोस्ट्स आणि फोटोला सुद्धा सुरक्षितता मिळाली आहे. त्यामुळेच कंपनीने फीडबॅक घेऊन नवीन प्रोफाईल लॉक पर्याय आणला आहे. एकदा प्रोफाईल लॉक इनेबल केल्यानंतर पब्लिक युजर्सला केवळ प्रोफाईल फोटो दिसेल. परंतु, त्यांची डिटेल्स दिसणार नाही. एक ब्लू लाईन दिसेल की प्रोफाईल लॉक आहे. फ्रेंड लिस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर बाकीची डिटेल्स किंवा त्या व्यक्तीच्या पोस्ट्स दिसतील. या ठिकाणी मिळेल ऑप्शन नवीन फीचर प्रोफाईलमध्ये 'more options' मध्ये जावून अॅक्सेस मिळेल. प्रोफाईलमधील 'more options' वर टॅप केल्यानंतर युजर्सला Lock Profile दिसेल. या ठिकाणी टॅप केल्यानंतर प्रोफाईल लॉक केले जाऊ शकणार आहे. असे केल्यानंतर फेसबुक युजर्संना स्पष्टपणे सांगेल की, प्रोफाईल लॉक केल्यानंतर याचा अर्थ काय आहे आणि त्यानंतर डिटेल्स सार्वजनिक युजर्संना दिसणार नाहीत हेही सांगेल. एकदा हे फीचर अॅक्टिव झाल्यानंतर युजर पब्लिक पोस्ट करू शकणार नाही. तसेच एक पॉप-अप सांगेल की, त्यांचा प्रोफाईल लॉक आहे. टॅग करता येऊ शकणार प्रोफाईल लॉक झाल्यानंतर तुम्हाला तुमचे मित्र टॅग करू शकणार आहे. परंतु, प्रोफाईल लॉक असल्याने तुम्ही जोपर्यंत allow करत नाहीत तोपर्यंत टॅगनंतरही फोटो टाइमलाइनवर दिसणार नाही. फेसबुक इंडिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अंखी दास यांनी सांगितले की, सोशल नेटवर्कने हे फीचर आणले आहे. याची युजर्संना संपूर्ण माहिती मिळावी यासाठी खास काळजी घेण्यात आली आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36mZ7tk
Comments
Post a Comment