व्हाट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट दिसत नाही? वापरा ही भन्नाट आईडिया

पुणे : सोशल मीडिया हा सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. यातच व्हाट्सऍपशिवाय जगण्याचा विचार देखील अनेक जण  करु शकत नाहीत. व्हाट्सऍप हे एक इन्स्टंट मेसेजिंग ऍप आहे. भारतात सध्या २० कोटींपेक्षा अधिक लोक व्हाट्सऍपचे वापरकर्ते आहेत. सध्याच्या घडीला सोशल माध्यमात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सऍप मध्ये नवनवे फीचर्स अपडेट होत असतात. या नव्या बदलानुसार व्हाट्सऍपच्या ब्रॉडकास्ट लिस्ट या ऑप्शन मध्ये बदल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आपल्याला अनेकदा एखादा महत्त्वाचा मेसेज अनेक जणांना पाठविण्याची इच्छा असते. मात्र सतत फॉरवर्ड होणारे मेसेज रोखण्यासाठी नवीन मर्यादा व्हाट्सऍपने घातली आहे. यानुसार मेसेज इतरांना फॉरवर्ड करताना दिसणारी ब्रॉडकास्ट लिस्ट सध्या काही व्हाट्सऍपच्या नवीन अपडेट मध्ये दिसण्याची बंद झालेली आहे. त्यामुळे एखादा मेसेज तुम्ही पाच जणांना फॉरवर्ड करु शकाल, पण यापुढे ब्रॉडकास्ट लिस्ट द्वारे मेसेज फॉरवर्ड करता येणार नाही. त्यामुळे प्रत्त्येक वेळेस एखादा मेसेज पाठविण्यासाठी कॉपी पेस्ट करण्याची गरज लागत आहे . मात्र आता यावर एक उपाय असून या पद्धतीनुसार एखादा मेसेज ब्रॉडकास्ट लिस्ट द्वारे अनेकांना फॉरवर्ड करता येऊ शकणार आहे. एखादा मेसेज फॉरवर्ड करताना ब्रॉडकास्ट लिस्ट दिसत नसल्यास ब्रॉडकास्ट लिस्ट वर प्रेस करून  येणाऱ्या पिन ऑप्शनचा वापर करून मेसेज फॉरवर्ड करता येऊ शकेल. यानुसार ब्रॉडकास्ट लिस्ट वर काही वेळ प्रेस केल्यानंतर, वर आलेल्या ऑप्शन मधील पिन सिलेक्ट केल्यास एखादा मेसेज फॉरवर्ड करताना पुन्हा ब्रॉडकास्ट लिस्ट दिसू शकेल. यामुळे तुम्ही एखादा मेसेज ब्रॉडकास्ट लिस्ट द्वारे इतरांना फॉरवर्ड करू शकता.
----------
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषधाचा वापर कोणासाठी?
---------
हिंमतवान ज्योतीला ट्रम्प कन्येचा सलाम
---------
दरम्यान यापूर्वी देखील फॉरवर्ड होणारे मेसेज रोखण्यासाठी व्हाट्सऍपने काही बदल केले होते. ज्यामध्ये एखादा मेसेज फक्त पाच जणांना फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली होती. पण त्यानंतर सुद्धा एखादा मेसेज पुन्हा फॉरवर्ड करायचा असल्यास एकाच व्यक्तीला तो फॉरवर्ड करता येऊ शकणार होता.



from News Story Feeds https://ift.tt/2ysIfVk

Comments

clue frame