३ मिनिटापेक्षा कमी वेळात ७० हजार स्मार्टफोनची विक्री

नवी दिल्लीः रियलमीचा लेटेस्ट बजेटमधील स्मार्टफोन ने पहिल्यास सेलमध्ये एक रेकॉर्ड बनवला आहे. या फोनची अनेकांना उत्सूकता होती. त्यामुळे अवघ्या तीन मिनिटाच्या काळात या फोनची ७० हजारांहून अधिक विक्री झाली आहे. ११ मे रोजी या फोनला लाँच करण्यात आले होते. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः कंपनीची ट्विटवरून माहिती कंपनीने रियलमी नार्जो १० ची जबरदस्त विक्री झाल्यानंतर याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. ट्विटर एक पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये कंपनीने म्हटले की, युजर्संनी प्रेम दाखवल्याबद्दल त्यांचे आभार. कंपनीच्या ट्विटमध्ये रियलमी नार्जो १० स्मार्टफोन पॉवरफुल क्वॉड कॅमेरा सेटअप स्मार्टफोन असल्याचे म्हटले आहे. रियलमी इंडियाचे हेड माधव सेठ सुद्धा या विक्रीच्या नव्या रेकॉर्डमुळे आनंदी आहेत. ग्राहकांनी पहिल्याच सेलला चांगला प्रतिसाद दिल्याने सेठ यांनी ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी १२८ सेकंदात ७० हजारांहून अधिक रियलमीच्या नार्जो १० स्मार्टफोनची विक्री झाल्याचे म्हटले आहे. वाचाः Narzo 10 चे खास वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ७२०x१६०० पिक्सल रिझॉल्यूशनसोबत ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ८० एसआसी प्रोसेसर दिला आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड रियलमी यूआय दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये रियर कॅमेरा दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्ससोबत ८ मेगापिक्सलचा लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2LCwNJV

Comments

clue frame