सॅमसंगचा 'हा' स्मार्टफोन ठरला जगात सर्वात जास्त विकला जाणारा फोन

नवी दिल्लीः जगात सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन कोणता असेल?, असा प्रश्न विचारल्यानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर अॅपलचा आयफोन किंवा शाओमीचे रेडमी स्मार्टफोन येऊ शकतात. परंतु, जगात सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन सॅमसंगचा फोन ठरला आहे. सॅमसंगचा स्टायलिश स्मार्टफोन ने बाजी मारली आहे. रिसर्च फर्म स्ट्रेटडी एनालिस्टने २०२० च्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेल्या स्मार्टफोनची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत सॅमसंगच्या गॅलेक्सी ए५१ ने बाजी मारली आहे. वाचाः या रिपोर्टच्या माहितीनुसार, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जगात Samsung Galaxy A51 चे ६० लाख फोनची विक्री झाली आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानावर शाओमीचा रेडमी ८ स्मार्टफोन आहे. तिसऱ्या नंबरवर सॅमसंग गॅलेक्सी ए२० प्लस फोन आहे. या फोनचे मार्केट शेअर १.७ टक्के आहे. चौथ्या नंबरवर सॅमसंगचा गॅलेक्सी ए१० एस आणि रेडमी नोट ८ आहे. या फोनचे १.६ टक्के मार्केट शेअर आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, करोना व्हायरसमुळे देशात - जगात आर्थिक मंदीचे सावट असल्याने लोक फोन खरेदी करण्यासंदर्भात विचार करीत आहेत. पैसा वसूल करणाऱ्या स्मार्टफोनकडे लोकांचा जास्त कल आहे. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी ए५१ ची भारतात किंमत २५ हजार २५० रुपये आहे. या किंमतीत ग्राहकांना ६ जीबी रॅम सह १२८ जीबी स्टोरेज मिळतो. हा फोन तीन रंगात म्हणजेच प्रिज्म क्रश ब्लॅक, प्रिज्म क्रश ब्लू आणि प्रिज्म क्रश व्हाईट आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये चार रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा, दुसरा लेन्स १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आहे. तिसरा ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि चौथा ५ मेगापिक्सलचा डेप्थ आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fTbBgz

Comments

clue frame