नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपला एक स्वस्त प्रीपेड प्लान सध्या बंद केला आहे. जिओचा हा ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. जिओचा हा प्लान आता कंपनीच्या वेबसाइटवरुन हटवला आहे. तो त्या ठिकाणी दिसत नाही. ९८ रुपयांचा प्लान हटवल्यानंतर जिओच्या स्वस्त प्लानची सुरुवात आता १२९ रुपयांपासून सुरू होत आहे. जिओचा ९८ रुपयांचा प्लान अन्य सेक्शनमधील स्मार्टफोनच्या प्लानमध्ये दिसत होता. परंतु, आता या सेक्शनमधून हटवला आहे. जिओचा प्रीपेड प्लानच्या अन्य सेक्शनमध्ये आता केवळ अफॉर्डेबल पॅक्स आणि जिओफोन प्लान्स दिसत आहेत. वाचाः आता १२९ रुपयांपासून प्लानची सुरुवात रिलायन्स जिओचा स्वस्तातील प्लान आता १२९ रुपयांपासून सुरू होतो. जिओचा १२९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लानमध्ये युजर्संना २ जीबी डेटा मिळत आहे. प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्संना १ हजार मिनिट मिळते. प्लानमध्ये ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे कॉम्पिमेंट्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओचा ९८ रुपयांच्या प्लानमध्ये हे मिळत होते जिओच्या प्रीपेड प्लानला आता यादीतून हटवले आहे. परंतु, या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसांची वैधता मिळत होती. प्लानमध्ये युजर्संना एकूण २ जीबी डेटा मिळत होता. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळत होती. तसेच युजर्संना ३०० एसएमएस पाठवण्याची सुविधा होती. प्लानमध्ये दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ६ पैसे प्रती मिनिट आययूसी चार्ज लावला जात होता. रिलायन्स जिओने गेल्या काही दिवसांपासून प्रीपेड यादीतील प्लान हटवले आहेत. जिओने नुकतेच १२९९ आणि १२९ रुपयांचा प्लान अन्य सेक्शनमध्ये आणले होते. यावेळी जिओने ९८ रुपयांचा प्रीपेड प्लानला पूर्णपणे हटवले आहे. जिओचा ९८ रुपयांचा प्रीपेड प्लानला डिसेंबरमध्ये दुसऱ्यांदा आणले होते. जिओने काही दिवसांपूर्वी ९९९ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना दरदिवशी ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी युजर्संना ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2X6TM50
Comments
Post a Comment